पार्टी किंवा घरातील कोणत्याही कार्यक्रमांमध्ये दारूचे सेवन केले जाते. काही लोक आनंद म्हणून दारूचे सेवन करतात तर काही लोक जीवनात आलेली दुःख विसण्यासाठी दारूचे सेवन केले जाते.जगभरात असंख्य लोक दारूचे सेवन करतात. यामुळे केवळ क्षणिक आनंद मिळतो. पण कालांतराने शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. दारूच्या अतिसेवनामुळे लिव्हर आणि शरीरातील इतर अवयवांना हानी पोहचण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला दुःख विसरण्यासाठी दारूचे सेवन का केले जाते? जाणून घ्या दारूचे सेवन केल्यामुळे शरीरात बदल होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
जीवनातील दुःख विसरण्यासाठी दारूचे सेवन का केले जाते? जाणून घ्या दारूचे सेवन केल्यामुळे शरीरात होणारे बदल

दारूचे सेवन केल्यामुळे शरीराचे गंभीर नुकसान होते. राग आल्यानंतर किंवा कोणत्याही गोष्टीचे मनात दुःख निर्माण झाल्यानंतर काहींना लगेच जाऊन दारू पिण्याची सवय असते.

मद्यप्राशन केल्यानंतर तणावातून मुक्ती मिळते, असे अनेकांना वाटते. मानसिक तणावातून सुटका मिळवण्यासाठी दारूचे सेवन करणे शरीरासाठी आणि मनासाठी अजिबात योग्य नाही.

मद्यप्राशन केल्यानंतर शरीर डोपामाईन रिलीज करतात. ही संप्रेरक शरीरात जास्त झाल्यानंतर खूप आनंद होतो. पण दारूची नशा चढल्यानंतर लोक भान हरपून जातात.

तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी दारू पिणे योग्य नाही. यामुळे डोक्यावरील कोणताही तणाव किंवा समस्या दूर होत नाहीत. त्यामुळे सतत दारूचे सेवन करू नये.

दिवसभरात सतत दारूचे सेवन केल्यास लिव्हर आणि पोटाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. लिव्हर कॅन्सर, आतड्यांचा कॅन्सर होऊ शकतो .






