लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात विवाह सोहळयाला विशेष महत्व आहे. विवाह हा केवळ सोहळा नसून दोन व्यक्तींचे मिलन असते.लग्नातील सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर वर आणि नववधूचा गृहप्रवेश केला जातो. गृह्प्रवेशासाठी घराच्या उंबरठ्यामध्ये तांदळाचे माप ठेवले जाते. हा क्षण सर्वच नववधूंसाठी अतिशय भावनिक असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नववधू लग्नानंतर गृहप्रवेश करताना तांदळाचे माप का ओलांडते? हा विधी नेमका का केला जातो, यामागे काय शास्त्रीय कारण आहे? याबद्दल सविस्तर माहिती सविस्तर सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
नववधू लग्नानंतर गृहप्रवेश करताना तांदळाचे माप का ओलांडते? यामागील कारण ऐकून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

लग्न झाल्यानंतर नववधू पहिल्यांदाच सासरी प्रवेश करते. घरातील प्रवेशदरम्यान तांदळाचे माप ठेवले जाते. हे मापो उजव्या पायाने ओलांडले जाते. त्यानंतर नववधू घरात प्रवेश करते.

हिंदू संस्कृतीत नववधूला सासरी लक्ष्मी सामान मानले जाते. गृहप्रवेश करून देवी लक्ष्मी घरात धन-धान्य आणि ऐश्वर्य घेऊन येते, तसेच वधूच्या शुभ पावलांमुळे सासरच्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराट यावी, म्हणून गृह्प्रवेशाचा विधी केला जातो.

कलशामध्ये ठेवलेले तांदूळ अन्न, संपत्ती आणि आनंदाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे नववधूच्या आगमनामुळे घरात कधीच अन्न, संपत्ती आणि आनंदापासून वंचित राहणार नाही, असे मानले जाते.

गृहप्रवेश हा केवळ विधी नसून घराची गृहलक्ष्मी म्हणून सन्मानित करण्याचा प्रयत्न असतो. नववधू समृद्धी आणि शुभतेचा स्रोत असते.

नववधूच्या आगमनामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि संपूर्णतेचे एक सुंदर शुभ प्रतीक मानले जाते. हिंदू संस्कृतीत केलेल्या जाणाऱ्या प्रत्येक विधीला विशेष महत्व आहे.






