झणझणीत चवीचे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. वडापाव, मिसळ, चिकन मटण रस्सा इत्यादी झणझणीत चवीचे पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण काहीवेळा अतितिखट पदार्थ खाताना नाक आणि डोळ्यांतून पाणी येते. पदार्थ खूप जास्त प्यायल्यानंतर सतत पाणी प्याले जाते. पण पाणी प्यायल्यानंतरसुद्धा पदार्थ तिखटच लागतो. आज आम्ही तुम्हाला तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर डोळे आणि नाकातून पाणी का येते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामागे अनेक वैज्ञानिक कारणे सुद्धा आहेत. (फोटो सौजन्य – istock)
तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर नाक-डोळ्यांतून पाणी का येते? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

जेवणात तिखट किंवा मिरची असलेले पदार्थ खाल्ल्यानंतर सगळ्यांच्या नाकातून आणि डोळ्यांपासून पाणी वाहू लागते. मिरचीमध्ये कॅप्साइसिन नावाचे एक नैसर्गिक रसायन आढळून येते, जे जिभेवर ठेवल्यानंतर वेदना जाणवू लागतात.

जिभेवर ठेवलेल्या मिरचीमुळे रिसेप्टर मेंदूला जळजळ किंवा धोक्याचे संकेत देतो. ज्यामुळे पदार्थाचा तिखटपणा कमी होण्याऐवजी तोंडात जास्त जळजळ होते आणि खाल्लेले पदार्थ खूप जास्त प्रमाणात तिखट लागतात.

तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर नाकाच्या ग्रंथी सक्रिय होतात, ज्यामुळे नाकातून पाणी येण्यास सुरुवात होते. काहीवेळा तिखटपणामुळे जळजळ होण्याची जास्त शक्यता असते.

जीभ, नाक आणि डोळे हे तिन्ही अवयव एकमेकांशी जोडलेले असतात. तिखट पदार्थांच्या सेवनामुळे या नसा उत्तेजित होतात आणि आरोग्य बिघडते. नसा उत्तेजित झाल्यामुळे डोळ्यांमधून पाणी येते.

काहींना तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर शरीराला लगेच घाम फुटतो. शरीर थंड ठेवण्यासाठी मेंदू घामग्रंथीना सक्रिय करतो. याच्या परिणामामुळे तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर त्वचेवर लगेच घाम येतो.






