प्रत्येक स्त्रीसाठी आई होणे ही भावना अतिशय आनंद देणारी आहे. गरोदरपणातील नऊ महिन्यांमध्ये गरोदर महिलेला वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होऊन डोहाळे लागतात. काहींना तिखट खाण्याची तर काहींना आंबट गोड पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. गर्भाशयातील बाळाला कोणताही पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर आईला सुद्धा तो पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. त्यामुळे सातव्या महिन्यात डोहाळे जेवण साजरा केले जाते. ही पूर्वीच्या काळापासून चालत आलेली जुनी परंपरा आहे. चला तर जाणून घेऊया सातव्या महिन्यात डोहाळे जेवण कर साजरा केले जाते आणि काय आहे त्यामागील जुनी परंपरा.(फोटो सौजन्य – pinterest)
सातव्या महिन्यात डोहाळे जेवण का साजरा करतात? जाणून घ्या यामागील महत्व आणि कारणे

सातवा महिना गर्भधारणेच्या उत्तरार्धात येतो, जिथे आईला पौष्टिक जेवण, आशीर्वाद आणि भावनिक आधाराची खूप जास्त गरज असते. आईचे आरोग्य, मनःशांती आणि बाळाच्या निरोगी विकासासाठी पौष्टिक आहार, नवीन कपडे डोहाळे जेवणात भेटवस्तू म्हणून दिल्या जातात.

सातव्या महिन्यात रूढी, परंपरेनुसार सर्व नातेवाईक आणि कुटुंब मिळून डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करतात. यामुळे महिलांना आनंद वाटतो आणि मनावरील तणाव कमी झाल्यासारखे वाटते.

डोहाळे जेवणात गरोदर महिलेला पतीसह चंद्रावर बसवण्याची परंपरा आहे. त्यानंतर पानांफुलांनी सजवलेल्या पाळण्यात गरोदर महिलेला बसवून तिची ओटी भरली जाते आणि गोड पदार्थ खाण्यास दिला जातो.

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात पारंपरिक गाणी, ओवाळणे आणि वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद मिळाल्याने आईला भावनिक आधार मिळतो. हा दिवस प्रत्येक स्त्रीसाठी खूप जास्त आनंदाचा असतो.

सातव्या महिन्यात डोहाळे जेवण हा गर्भवती आईला प्रेम, पोषण, आनंद देण्यासाठी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा आणि पारंपरिक सोहळा आहे.






