कधीकधी काही गोष्टी विज्ञानाच्या पलिकडच्या असतात ज्यांना समजणं अवघडं ठरतं. अशीच एक घटना अमेरिकेतील एका महिलेसोबत घडून आली आहे. महिलेने केलेल्या दाव्यानुसार, तीन वेळा तीला वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित करण्यात आले आहे. दोन वेळा, तिने स्वतःला दुसऱ्या जगात उभे असलेले पाहिले आहे जिथे विचित्र प्रकाश, प्राणी तिचे स्वागत करतात आणि नंतर तिला परत पाठवतात... एका संदेशासह! चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
"मी 3 वेळा मेली आहे" महिलेचा अजब-गजब दावा, मृत्युपलीकडचे ते सत्य पाहताच... आता वृद्धांना देते सांत्वन

महिलेचे नाव नॉर्मा एडवर्ड्स आहे. ती सांगते की, "मृत्यू हा शेवट नाही, तर एका दुसऱ्या प्रवासाची सुरुवात दर्शविणारा दरवाजा आहे." वैद्यकीयदृष्ट्या तिला तीन वेळा मृत घोषित करण्यात आले असून दोन वेळा तिने स्वत:ला दुसऱ्या जगात उभे असलेले पाहिले जिथे तिला काही अनोख्या गोष्टी पाहायला मिळाल्या.

वयाच्या २० व्या वर्षी, ब्रेकडाऊनमुळे नॉर्मा बेशुद्ध पडली. ती म्हणते, "मी स्वतःला छतावर तरंगताना पाहिले. खाली, माझे शरीर ऑपरेशन टेबलवर पडले होते, नंतर मी एका काळ्या बोगद्यातून वेगाने पुढे सरकत होते." शेवटी, ती एका मोठ्या पडद्यासमोर येते जिथे तिचे संपूर्ण आयुष्य एखाद्या चित्रपटासारखे दिसते, नंतर एक शांत नदी...

दुसऱ्या बाजूला तिला उभे असलेले परिचित आत्मे आणि तिची काकू दिसली जी तिला भेटणारच होती पण तितक्यात अचानक तिला आवाज आला की, "तुम्हाला परत जावे लागेल, तुमचा वेळ अजूनही संपला आहे," आणि ती परत आली.

नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याच्या हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर ती पुन्हा त्याच बोगद्यात गेली, तोच प्रकाश. यावेळी, एक महिला व्यक्तिरेखा... नोर्मा तिला "देवदूत" म्हणते, तिचा हात धरताना दिसते, परंतु स्वर्गाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचण्यापूर्वीच तिला पुन्हा परत पाठवले जाते.

नॉर्मा आता ज्येष्ठ नागरिकांच्या समुदायांमध्ये काम करते आणि मृत्यूच्या भीतीने जगणाऱ्यांना सांत्वन देते. ती म्हणते, "प्रकाशात विलीन झाल्यावर येणाऱ्या शांतीला शब्द स्पर्श करू शकत नाहीत. आत्मा कधीही मरत नाही."






