आपण आजवर A, B, AB आणि O या चार रक्तगटांविषयी ऐकले आहे. प्रत्येकाच्या शरीरीत या चार रक्तगटांपैकी एक रक्तगट असतो पण नुकताच एक दुर्मिळ रक्तगट बंगळूरुमधील एका ३८ वर्षिय महिलेमध्ये आढळून आला आहे ज्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. या रक्तगटाचे नाव काय आहे आणि आपात्कालीन परीस्थितीत त्यासाठी काय केले जाते ते आज आपण जाणून घेणार आहोत.
A, B, AB किंवा O नाही तर भारतात सापडलाय जगातील पहिला रहस्यमयी ब्लड ग्रुप; पाहून डॉक्टरांनाही बसला आश्चर्याचा धक्का
या रक्तगटाचे नाव आहे CRIB, याचा फुलफाॅर्म Chromer India Bengaluru असा आहे. ब्लड सायन्यमध्ये ही आतापर्यंतची सर्वात दुर्मिळ गोष्ट मानली जात आहे.
झालं असं की, महिलेच्या हार्ट सर्जरीसाठी जेव्हा डाॅक्टरांनी तिचा ब्लडग्रुप शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा सामान्य ब्लड ग्रुपपैकी एकही गट त्यात बसला नाही, जे पाहून डाॅक्टर हैराण झाले
अशा प्रकारच्या दुर्मिळ रक्तगटाची ओळख फक्त उच्चस्तरीय प्रयोगशाळा किंवा राष्ट्रीय संस्थेसारख्या संस्थांमध्येच शक्य आहे. कारण सामान्या चाचणीमध्ये ते शोधता येत नाही
अशावेळी, डाॅक्टर शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाच्या शरीरीतून थोडे रक्त बाजूला काढून ठेवतात, जेणेकरुन आपत्कालीन परीस्थितीत ते रक्त परत पाठवता येईल. याला वैद्यकीय भाषेत 'ऑटोलॉगस ब्लड ट्रान्सफ्यूजन' असे म्हणतात
यामध्ये रुग्णाच्या शरीरातून रक्त घेतले जाते आणि गरज पडल्यास त्याला परत ट्रान्सफ्यूज केले जाते. भारतात NIIH (National Institute of Immunohaematology) दुर्मिळ रक्तगट असलेल्या लोकांचे एक विशेष रजिस्टर तयार करत आहे जेणेकरुन आपत्कालिन परिस्थितीत रक्तदात्यांना शोधण्यास मदत होईल