भारतीय पदार्थांची चव जगभरात सगळीकडे फेमस आहे. भारतीय पदार्थ चवीला जितके सुंदर लागतात, तेवढ्याच त्या पदार्थांची वैशिष्ट्य सुद्धा नाविन्यपूर्ण आहेत. भारतातील अनेक गोड, तिखट आणि मसालेदार पदार्थ प्रसिद्ध आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मिळणाऱ्या पदार्थाना स्वतःची अशी नावे आहेत. मात्र यापूर्वी पदार्थांची भारतीय नावे ऐकली असतील, पण आज आम्ही तुम्हाला काही भारतीय पदार्थांची इंग्रजीमधील नावे सांगणार आहोत. या पदार्थांची गंमतीशीर नावे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. (फोटो सौजन्य – istock)
'या' भारतीय पदार्थांची इंग्रजीतील गंमतीशीर नावे ऐकून व्हाल आश्चर्यचकित
गणपती बाप्पाच्या प्रसादाला किंवा इतर कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी घरात काजूकातली आणली जाते. काजूकातली हे भारतीय नाव आहे. गोड बर्फीला इंग्रजीमध्ये फज असे म्हणतात.
पावसाळ्यात बनवल्या जाणाऱ्या गरमागरम भजीला इंग्रजीमध्ये फ्रिटर असे म्हणतात. भजी प्रामुख्याने बेसनपासून बनवली जाते.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गुलाबजाम खायला खूप जास्त आवडतात. गुलाबजामला इंग्रजीमध्ये इंडियन सिरप डंपलिंग असे म्हणतात.
दक्षिण भारतातील अतिशय प्रसिद्ध पदार्थ म्हणजे इडली. इडलीला इंग्रजीमध्ये स्टीम्ड राईस केक असे म्हणतात. हा पदार्थ खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबार सोबत खाल्ला जातो.
गोड, कुरकुरीत जलेबीला इंग्रजीत फनेल केक असे म्हणतात. साखरेच्या पाकात घोळवून तयार केलेली जिलेबी सगळेच आवडीने खातात.