Aahilyanagar News: दुसरा दिवस भाजपासाठी ठरला शुभ; तीन बिनविरोध, ६८ जागांसाठी २८३ उमेदवार रिंगणात
युती, आघाडीचा निर्णय उशिरापर्यंत रखडल्याने युती आणि आघाडीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. शिवसेना शिंदे गटाने महायुतीची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर स्वबळाचा नारा दिला. ऐनवेळी ही घडामोड घडल्याने अनेक प्रभागात शिवसेनेला उमेदवार शोधावे लागले. भाजपात देखील नाराजांची संख्या मोठी असल्याने ते नाराजांनाही शिवसेनेला मिळाले. शिवसे नेचा एबी फॉर्म विनासायास मिळाले. मात्र काही ठिकाणी एबी फॉर्म वाटपातील तांत्रिक चुकांमुळे त्यांचे अर्ज बाद झाल्याने अपक्ष म्हणून त्यांना लढावे लागणार आहे. आज अर्ज मागे घेण्याचा दुसरा दिवस भाजपासाठी जल्लोषाचा उगवला. (Maharashtra Local body Election)
आरा रा रा खतरनाक! 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; ‘या’ राज्यात चकमकीचा थरार; सर्च ऑपरेशन जारी
प्रभाग सहा व येथे भाजपच्या सोनाबाई शिंदे बिनविरोध झाल्या असल्या तरी येथे शिवसेनेने निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर टीका केली. विरोधी उमेदवार शिरसूल यांची सही नसताना त्यांचा माघार फॉर्म स्वीकारल्याचा आरोप केला. उमेदवाराने दाद मागूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे. या अर्जावर रीतसर सुनावणी होऊन ते फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले.
उबाठा पक्षाने दोघांना पक्षाचा एबी फॉर्म दिलेला होता. त्यातील गौरव ढोणे यांनी अर्ज दाखल करताना एबी फॉर्म दाखल केलाव नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज अपक्ष म्हणून राहिला, तोदेखील त्यानी आज मागे घेतला. तसेच दुसन्या एका त्याच्या अधिकृत उमेदवाराने त्यांचा अर्ज पक्षाश कोणतीही चर्चा न करता मागे घेतला, उबाद शहर प्रमुख किरण काळे यांनीच ही माहिती देत या दौन उमेदवारांना गद्दार म्हटले आहे त्यांच्यावर कारवाई करणार आहेत.
प्रभाग सहा व आणि ड या दोन ठिकाणी अनुक्रमे सोनाबाई तायगा शिंदे व करण उदय कराळे आणि प्रभाग सात व मध्ये पुष्पा अनिल बोरुडे हे तीन भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आले. मनपात भाजपाचे नगरसेवक बिनविरोध येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यातही एकाचवेळी तिथे बिनविरोध झाल्याने भाजपाला हास्यवायू होणे शिल्लक आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप या दोन नेत्यांनी शहरात आखलेली व्यूहरचना आखली आहे. ती यशस्वी होण्यासाठी सुरुवातीलाच बिनविरोध आलेल्या पाच जागा बुस्टर डोस मानला जात आहे.






