Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : मंत्रिमंडळातून वगळलेले सावंत, केसरकर अद्याप ‘नॉट रिचेबल’; पण सत्तारांनी घेतली ‘या’ मंत्र्याची भेट

सत्तेतून बाहेर पडलेल्या नेत्यांच्या नाराजीची 'धुसफूस' अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या काळात राजकीय विजनवासात गेलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार नुकतेच मुंबईत दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 07, 2026 | 09:43 AM
abdul-sattar

abdul-sattar

Follow Us
Follow Us:

मुंबई : नोव्हेंबर 2024 मध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नवे सरकार स्थापन झाले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला. या घटनेला आता दीड वर्षे उलटली आहेत. मात्र, सत्तेतून बाहेर पडलेल्या नेत्यांच्या नाराजीची ‘धुसफूस’ अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या काळात राजकीय विजनवासात गेलेले माजी मंत्री अब्दुल सत्तार नुकतेच मुंबईत दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांपासून मुंबई आणि विधिमंडळापासून दूर असलेले अब्दुल सत्तार अचानक मुंबईत प्रकटले. अजिंठा लेणी परिसरातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ७०० एकर क्षेत्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची त्यांच्या ‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मात्र, विशेष बाब अशी की, सत्तार यांनी मंत्र्यांची भेट घेतली असली तरी त्यांनी मंत्रालयात जाणे टाळले. सत्तेतून पायउतार झाल्याची सल अद्याप कायम असल्याचेच यातून दिसून येते.

Vijay Congress Alliance : तामिळनाडूमध्ये नवीन समीकरण? विजयच्या पक्षाला काँग्रेसचे समर्थन; मात्र ठेवली मोठी अट

दरम्यान, २०२४ च्या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर तसेच अजित पवार गटाचे दिलीप वळसे-पाटील, संजय बनसोडे, अनिल पाटील यांसारख्या वजनदार नेत्यांना स्थान मिळाले नव्हते. शपथविधीच्या दिवशीच डावलले गेल्याचे समजताच हे नेते नागपूर विमानतळावरून तडक आपल्या घराकडे रवाना झाले होते.

सावंत, केसरकरांची सभागृहात नाही उपस्थिती

गेल्या दीड वर्षात विधिमंडळाची पाच अधिवेशने झाली. मात्र, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांनी सभागृहात आपली उपस्थिती दर्शवली नाही. याउलट, दिलीप वळसे-पाटील यांनी मात्र ज्येष्ठत्वाचे भान राखत प्रत्येक अधिवेशनाला न चुकता हजेरी लावली आहे.

Thalapathy Vijay : तामिळनाडूच्या राजकारणात ‘विजय’ पर्व! उद्या सकाळी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; राज्यपालांकडे केला दावा

Web Title: Abdul sattar met with shambhuraj desai in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • Abdul Sattar
  • Deepak Kesarkar
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
4

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.