विजयच्या पक्षाला काँग्रेसचे समर्थन; मात्र ठेवली मोठी अट (Photo Credit- X)
काँग्रेसचे तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले की, हा पाठिंबा ‘धर्मनिरपेक्षता’ टिकवून ठेवण्यासाठी आणि ‘जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी’ देण्यात आला आहे. संविधानावर विश्वास नसणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस विजय यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. विशेष म्हणजे, ही युती केवळ सरकार स्थापनेपुरती मर्यादित नसून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकत्रित काम करणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
BREAKING: The Congress Party has formally handed over its letter of support to Thalapathy VIJAY for the formation of the Tamil Nadu government. pic.twitter.com/UX9YggrC3q — Actor Vijay Team (@ActorVijayTeam) May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये 9 मे ला होणार शपथविधी; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सुवेंदू आघाडीवर
आतापर्यंत काँग्रेस तामिळनाडूमध्ये द्रमुक (DMK) च्या नेतृत्वाखालील आघाडीचा अविभाज्य भाग होती. मात्र, राज्यातील तरुणांचा कल आणि जनतेचा बदललेला मूड ओळखून काँग्रेस हायकमँडने स्थानिक नेत्यांना विजय यांच्यासोबत जाण्याचे निर्देश दिले. तामिळनाडूच्या जनतेने विजय यांच्या रूपाने एक नवीन आणि पुरोगामी पर्याय निवडला असून, त्याचा सन्मान करणे हे आमचे घटनात्मक कर्तव्य असल्याचे काँग्रेसचे मत आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील DMK आघाडीला मोठा धक्का बसला असून, DMK ने याला ‘विश्वासघात’ संबोधले आहे.
बहुमतासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित आकड्यांसाठी विजय यांनी आता AIADMK प्रमुख एडप्पाडी के. पलानीस्वामी (EPS) यांच्याकडेही पाठिंब्याचे पत्र पाठवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, AIADMK मध्ये या समर्थनावरून दोन गट पडले आहेत. राज्यसभा खासदार सी. व्ही. षणमुगम यांच्या नेतृत्वाखालील एक गट विजय यांना पाठिंबा देण्यास अनुकूल आहे. जर AIADMK चा पाठिंबा मिळाला, तर तामिळनाडूच्या राजकारणात एका नवीन युगाची सुरुवात निश्चित मानली जात आहे.






