तामिळनाडूच्या राजकारणात 'विजय' पर्व! (Photo Credit- X)
TVK Chief Vijay today met Governor Rajendra Vishwanath Arlekar and staked claim to form the government with Congress support. pic.twitter.com/bRupzUxiDk — Soumyajit Pattnaik (@soumyajitt) May 6, 2026
विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा उद्या सकाळी १०:०० ते ११:१५ या शुभ मुहूर्तावर पार पडणार आहे. राज्यपालांनी निश्चित केलेल्या या विशिष्ट वेळेत विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी विजय सकाळी १०:०० वाजेपूर्वीच घटनास्थळी पोहोचण्याची शक्यता आहे.
शपथविधीसाठी चेन्नईतील प्रसिद्ध नेहरू स्टेडियमची निवड करण्यात आली आहे. या स्टेडियमची आसनक्षमता ५,००० इतकी असून, जनतेला या ऐतिहासिक प्रसंगाचे थेट साक्षीदार होता यावे, या उद्देशाने या भव्य ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या राजकारणातील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियमवरील कर्मचाऱ्यांना सर्व आवश्यक तयारी युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्या सकाळी ६:०० वाजेपर्यंत संपूर्ण स्टेडियम प्रशासनाकडे सोपवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कडेकोट सुरक्षा आणि भव्य नियोजनासह हा सोहळा पार पडणार आहे.
सुपरस्टार थलापती विजय यांच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षाला सरकार स्थापनेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. २३४ जागांच्या तामिळनाडू विधानसभेत १०८ जागा जिंकून TVK हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमताच्या ११८ या जादूई आकड्यापासून तो अवघ्या १० जागा दूर होता. आता काँग्रेसच्या ५ आमदारांच्या पाठिंब्यामुळे विजय आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.
काँग्रेसचे तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले की, हा पाठिंबा ‘धर्मनिरपेक्षता’ टिकवून ठेवण्यासाठी आणि ‘जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी’ देण्यात आला आहे. संविधानावर विश्वास नसणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस विजय यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. विशेष म्हणजे, ही युती केवळ सरकार स्थापनेपुरती मर्यादित नसून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकत्रित काम करणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये 9 मे ला होणार शपथविधी; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सुवेंदू आघाडीवर






