Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Girish Mahajan News: महिलेने अपमान केल्याच्या प्रकारावर गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; नेमकं काय घडलं वरळीत?

मुंबईतील वरळी येथील जांबोरी मैदानाच्या परिसरात महिला आरक्षण विधेयकाविरोधातील आंदोलन सुरू होते, यात मंत्री गिरीश महाजन हेदेखील सहभागी झाले होते. त्यामुळे जवळपास एक तासाहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 22, 2026 | 02:51 PM
Girish Mahajan Worli Protest, Mumbai Traffic Jam News, Women’s Reservation Bill Protest,

Girish Mahajan Worli Protest, Mumbai Traffic Jam News, Women’s Reservation Bill Protest,

Follow Us
Follow Us:

 

Mumbai News: संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक फेटाळण्यात आले. यानंतर भाजप या मुद्द्यावरुन चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईतील वरळी येथील जांबोरी मैदानाच्या परिसरात महिला आरक्षण विधेयकाविरोधातील आंदोलन सुरू होते, यात मंत्री गिरीश महाजन हेदेखील सहभागी झाले होते. त्यामुळे जवळपास एक तासाहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे संतप्त झालेल्या महिलेने थेट गिरीश महाजन यांच्याशी वाद घातला. ती महिला इतकी संतापली होती कि तिने पोलिसांनाही थेट प्रश्न विचारले. मैदान रिकामे असताना रस्त्यावर कार्यक्रम करण्यास परवानगी का दिली? असा सवाल तिने पोलिसांना केला. त्याचवेळी ने मंत्री गिरीश महाजन यांना तर ‘गेट आउट फ्रॉम हियर…’ अशा शब्दांत तिथून जाण्यास सांगितले. या संबंध प्रकरणावर आता गिरीष महाजन यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

11th admission process : अकरावीला प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा…; काय आहे अंतिम अंतिम

मंगळवारी महिला मोर्चादरम्यान घडलेल्या वादाच्या घटनेवर भाजप नेते Girish Mahajan यांनी प्रतिक्रिया दिली असून, संबंधित प्रकार दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका महिलेने मोर्चाच्या ठिकाणी येऊन संताप व्यक्त करत वाद घातल्याची घटना घडली. महाजन म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. काँग्रेसने या विधेयकाला विरोध केल्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला, त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची अडचण निर्माण झाली.”

या दरम्यान एक महिला घटनास्थळी आली आणि तिथे संतप्त प्रतिक्रीया दिली. याबाबत बोलताना महाजन म्हणाले की, “मी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना त्या समोर आल्या आणि ‘तुम्ही रस्ते बंद कसे करू शकता?’ असा सवाल करू लागल्या. त्यांनी मैदानात जाऊन आंदोलन करण्यास सांगितले. पोलिसांनी त्या महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या आणि आक्षेपार्ह भाषेत बोलत होत्या,” असेही त्यांनी नमूद केले.

Shriram Finance च्या FD व्याजदरात बदल; 6 मेपासून नवे दर होणार लागू, पाहा किती मिळेल Return

आंदोलनाच्या ठिकाणी महिला पोलिसांचाही बंदोबस्त होता आणि सर्वांनी संयमाची भूमिका घेतली. मी स्वतः त्या महिलेला १० ते १५ मिनिटांत रस्ता मोकळा करू असे सांगितले होते, परंतु त्या तयार नव्हत्या,” असे त्यांनी नमुद केले. दरम्यान, संबंधित महिलेने पाण्याची बाटली उचलून मोर्चातील महिलांच्या दिशेने फेकल्याचा आरोपही महाजन यांनी केला. “अशा प्रकारे बाटली फेकणे निश्चितच अयोग्य आहे. हा मोर्चा महिलांच्या सन्मानासाठी होता,” असे त्यांनी ठामपणे म्हटले.भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन देत महाजन यांनी सांगितले की, मोर्चाचा मार्ग आधीच निश्चित करण्यात आला होता आणि त्यानुसारच आंदोलन पार पडत होते.

 

 

Web Title: Get out from here angry woman confronts minister girish mahajan over traffic jam in worli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • BJP Politics
  • girish mahajan
  • Mumbai News

संबंधित बातम्या

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत
1

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत

मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर एकटी दटून राहिली रिया अहिर… तरुणीच्या हिमतीची होतेय सर्वत्र चर्चा; नक्की आहे तरी कोण?
2

मुंबई पोलिसांच्या व्हॅनसमोर एकटी दटून राहिली रिया अहिर… तरुणीच्या हिमतीची होतेय सर्वत्र चर्चा; नक्की आहे तरी कोण?

Godrej Block Launch: गोदरेज कन्झ्युमरकडून ‘गोदरेज ब्लॉक’ लाँच; भामला फाऊंडेशनसोबत ५०० महिलांना देणार मोफत ‘पिंक ई-रिक्षा’
3

Godrej Block Launch: गोदरेज कन्झ्युमरकडून ‘गोदरेज ब्लॉक’ लाँच; भामला फाऊंडेशनसोबत ५०० महिलांना देणार मोफत ‘पिंक ई-रिक्षा’

Mumbai News: उड्डाणपुलांमधील चुका पालिकेला भोवल्या! मुंबईतील प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी २९ तज्ज्ञ कंपन्यांची नियुक्ती
4

Mumbai News: उड्डाणपुलांमधील चुका पालिकेला भोवल्या! मुंबईतील प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी २९ तज्ज्ञ कंपन्यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.