(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एसएफएलच्या बँक कर्ज सुविधा, अपरिवर्तनीय डिबेंचर्स, सबऑर्डिनेटेड कर्जरोखे आणि मुदत ठेव योजनांच्या दीर्घकालीन कर्ज पतमापन दर्जामध्ये नुकतीच सुधारणा झाली आहे. क्रिसिल रेटिंग्स, आयसीआरए, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च आणि केअर रेटिंग्स या संस्थांनी विविध योजनांसाठीच्या दीर्घकालीन कर्ज पतमापन दर्जामध्ये आणखी सुधारणा करताना अलीकडेच एसएफएलला ‘एएए (स्थिर)’ असा सर्वोच्च पतमापन दर्जा बहाल केला आहे. सदर सुधारित पतमापन दर्जा प्रत्येक एजन्सीच्या स्तरावरील सर्वोच्च मानांकन आहे. पतमापन दर्जातील या सुधारणेमुळे कंपनीने व्याजदरात बदल केला आहे.
मुदत ठेवींना क्रिसिल रेटिंग्सकडून “क्रिसिल AAA/स्टेबल”, आयसीआरएकडून ” |आयसीआरए] AAA (स्टेबल)”, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चकडून “इंड AAA/स्टेबल” आणि केअर रेटिंग्सकडून “केअर AAA / स्टेबल” असा पतमापन दर्जा देण्यात आला आहे.
यावर १० कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी 12 महिन्यांसाठी ठेवल्यास त्यावर सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.00% इतका आहे. पण सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 6.75% इतका लागू होणार आहे.
जर हिच रक्कम तुम्ही 15 महिने डिजीटल स्वरुपात ठेवल्यास त्यावर सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.25% इतका आहे. पण सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 7.05% इतका लागू होणार आहे.
१० कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी 18 महिने – 23 महिन्यांसाठी ठेवल्यास त्यावर सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.15% इतका आहे. पण सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 7.00% इतका लागू होणार आहे.
हिच रक्कम तुम्ही 24 महिने – 35 महिने ठेवल्यास त्यावर सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.25% इतका आहे. पण सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 7.05% इतका लागू होणार आहे.
१० कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवी 36 महिने – 60 महिन्यांसाठी ठेवल्यास त्यावर सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.60% इतका आहे. पण सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 7.25% इतका लागू होणार आहे.
ज्येष्ठ नागरिक ठेव किंवा नूतनीकरणाच्या वेळी वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असल्याच वार्षिक ०.५०% अतिरिक्त व्याजासाठी पात्र ठरणार आहेत.
महिला ठेवीदारांना वार्षिक ०.०५% अतिरिक्त व्याज मिळणार आहे.
मुदत पूर्ण झालेल्या ठेवींच्या नूतनीकरणावर वार्षिक ०.१५% इतकं अतिरिक्त व्याज मिळेल.
ठेवी १,०००/- रुपयांच्या पटीत स्वीकारल्या जातील, ज्याची किमान रक्कम ५,०००/- रुपये इतकी असणार आहे.
याचा सुधारित दर दिनांक ६ मे २०२६ पासून लागू होणार आहे.
मुदत
12-23 महिन्यांसाठीचा सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.00% आहे तर सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 6.75% इतका होणार आहे.
24-35 महिन्यांसाठीचा सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.25% आहे तर सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 7.05% इतका होणार आहे.
36-48 महिन्यांसाठीचा सध्याचा व्याजदर प्रतिवर्ष 7.60% आहे तर सुधारित व्याजदर प्रतिवर्ष 7.25% इतका होणार आहे.
महिला ठेवीदारांना अतिरिक्त ०.०५% वार्षिक व्याज मिळेल.
स्थिर गुंतवणूक योजनेच्या (एफआयपी) इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही.
एफआयपीचा हप्ता ५००/- रुपयांच्या पटीत स्वीकारला जाईल, ज्याची किमान रक्कम १,०००/- रुपये असेल.






