Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; हर्षवर्धन सपकाळ पंढरपूरात जाऊन करणार उपोषण

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच, आपणही आंदोलनस्थळी उपस्थित राहून उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 13, 2026 | 06:25 PM
Harshvardhan Sapkal supports Rohit Pawar Hunger strike,

Harshvardhan Sapkal supports Rohit Pawar Hunger strike,

Follow Us
Follow Us:

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांसाठी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन’ पार पडत असून आज (शनिवार, १३ जून) आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सत्त्ताधारी नेत्यांनी यावरून रोहित पवार यांना लक्ष्यही केले आहे. विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनात जाहीर पाठींबा असल्याचे पत्र दिले आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच, आपणही आंदोलनस्थळी उपस्थित राहून उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईतील टिळक भवन येथे मपञकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी असून जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत, म्हणून संपूर्ण कर्जमाफी करून, सात-बारा कोरा करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरु केलेल्या उपोषणाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत, त्या सरकारने मान्य कराव्यात. रोहित पवार यांच्या उपोषणस्थळी जाऊन मी सुद्धा उपोषण करणार आहे,” असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

‘सरसकट कर्जमाफीशिवाय सरकारकडे पर्याय नाही,’ बाळासाहेब थोरातांचा रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा

रोहित पवारांच्या मागण्या काय?

रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. विनाअट सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवर देखील रोहित पवारांनी भाष्य करून सरकारकडे मागण्या केल्या आहेत. रोहित पवारांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “आंदोलन केल्यानंतर कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल १२०० रुपयांवरून १५८० रुपयांपर्यंत सरकारने वाढ केली आणि आता तो १६५० रुपयांपर्यंत वाढवल्याबद्दल सरकारचे आभार! पण दरात अशी टप्प्याटप्प्याने थोडी-थोडी वाढ करण्याने शेतकऱ्यांवर अन्याय होतो. त्याऐवजी एकाचवेळी किमान प्रतिक्विंटल २५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची आमची सरकारकडं मागणी आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना फायदा होईल.”

आंदोलन केल्यानंतर कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल १२०० रुपयांवरून १५८० रुपयांपर्यंत सरकारने वाढ केली आणि आता तो १६५० रुपयांपर्यंत वाढवल्याबद्दल सरकारचे आभार! पण दरात अशी टप्प्याटप्प्याने थोडी-थोडी वाढ करण्याने शेतकऱ्यांवर अन्याय होतो. त्याऐवजी एकाचवेळी किमान प्रतिक्विंटल २५००… pic.twitter.com/a5gEaw4lyf — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 13, 2026

“तसंच नाफेडच्या माध्यमातून २ लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली खरी, पण गेल्या पंधरा दिवसांचा विचार केल्यास नाशिकमध्ये आतापर्यंत केवळ १०० टन इतक्याच कांद्याची खरेदी करण्यात आली. संथ गतीने चालणारी यंत्रणा, जाचक अटी यामुळं कांदा खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरु असून परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने कवडीमोल भावात कांदा विकण्याची वेळ येत आहे. त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, नाफेड, एनसीसीएफ आणि वखार महामंडळ या सर्व यंत्रणांना स्पष्ट सूचना द्याव्यात आणि कांदा खरेदी करताना ज्या जाचक नियमांची फूटपट्टी लावली जाते, त्याही शिथिल करण्यात याव्यात, ही विनंती!” असे ते यावेळी म्हणाले.

‘रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका, त्यांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे…’; गोपीचंद पडळकर यांची टीका

Web Title: Harshvardhan sapkal supports rohit pawar hunger strike for full fledge loan waiver for farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Farmer Loan Waiver
  • Harshvardhan Sapkal
  • rohit pawar

संबंधित बातम्या

आता MPSC चाही पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला खेळ थांबवा, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा
1

आता MPSC चाही पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला खेळ थांबवा, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा

Rohit Pawar News: TET घोटाळ्यातील आरोपी आणि भाजप नेत्याचे आर्थिक कनेक्शन ! रोहित पवारांचा गंभीर आरोप
2

Rohit Pawar News: TET घोटाळ्यातील आरोपी आणि भाजप नेत्याचे आर्थिक कनेक्शन ! रोहित पवारांचा गंभीर आरोप

‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
3

‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

‘धर्मेंद्र प्रधानांनंतर आता “टोलकरी गडकरीं”; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका, गडकरींच्या राजीनाम्यावरून मोठ्या चर्चाना उधाण
4

‘धर्मेंद्र प्रधानांनंतर आता “टोलकरी गडकरीं”; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका, गडकरींच्या राजीनाम्यावरून मोठ्या चर्चाना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.