पंढरपूर नगरपालिकेचा सत्तासंघर्ष ऐन थंडीत 'हाय व्होल्टेज'; भावकीचे राजकारण सुरू (File Photo)
पंढरपूर : पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता जोमात सुरू झाला आहे. फोडाफोडी बैठका भावकी, वाडा, जात-धर्माचे राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान, प्रचाराच्या निमित्ताने भाजप आणि आघाडीत उमेदवार आणि त्यांचे समर्थक जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. त्यामुळे ऐन नोव्हेंबरच्या थंडीत पंढरपूर पालिकेचा सत्तासंघर्ष हायव्होल्टेज बनला आहे.
पंढरपूर पालिकेची निवडणूक यंदा चुरशीची अटीतटीची होत आहे. भाजप विरुद्ध आघाडी अशी दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत काय होणार ? हे कोणताच राजकीय तज्ज्ञ ठामपणे सांगू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रतिष्ठेची लढत झाली आहे. यापूर्वी परिचारक गट विरुद्ध भालके गटात तुल्यबळ लढत होती. परंतु परिचारक गट आपापल्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या गटाने या भाजप पक्षांपुढे आव्हान निर्माण केले आहे.
हेदेखील वाचा : मी स्टार प्रचारक कशाला हिशोब लागतोय; निवडणूक आयोगाबाबत बावनकुळे हे काय गेले बोलून? Video तुफान व्हायरल
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनाने प्रचार सुरू केला आहे, भाजप आणि आघाडी गटाच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी नेटाने प्रचार सुरू केला आहे. उमेदवारांनी प्रभागनिहाय पहिली फेरी केल्याचे चित्र आहे. येत्या चार पाच दिवसांत प्रचाराचा वेग आणि तीव्रता आणखी वाढेल, तसे यश अपयशाचे पारडे झुकू लागेल.
एकंदरीत प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजप, शिवसेना, मनसे, आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी इलेक्शन फिव्हर चांगलाच तापवला आहे. त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेचा सत्तासंघर्षाचा आखाडा ऐन नोव्हेंबरच्या थंडीत हॉट झाला आहे.
शिवसेनेचा विकासाचा अजेंडा
शिवसेनेचा विकासाचा अजेंडा आहे. भंडारा व गोंदियाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रस्थापितांना बाहेरचा रस्ता दाखवा, अशी टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत, त्यामुळे भंडारा व गोंदियात परिवर्तनासाठी शिवसेनेच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे केले.
हेदेखील वाचा : Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन






