Safe Driviing Tips
धुक्यात वाहन चालवताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गाडीचा वेग नियंत्रित ठेवणे. पहाटे किंवा रात्री धुके अधिक दाट असते, ज्यामुळे समोरचा रस्ता नीट दिसत नाही. अशा वेळी वेग कमी ठेवल्यास अचानक ब्रेक लावण्याची वेळ आल्यास वाहनावरील नियंत्रण सोपे राहते. सामान्यतः समोर असलेल्या वाहनापासून किमान १०० मीटर अंतर राखणे सुरक्षित मानले जाते.
तसेच धुक्यात विनाकारण लेन बदलणे टाळावे. लेन बदलताना अचानक समोरून वाहन येण्याची शक्यता अधिक असते. विजिबिलिटी कमी असल्याने दुसऱ्या वाहनाचा वेग आणि त्याचे अंतर अचूक मोजणे कठीण जाते. त्यामुळे तुमच्या लेनमध्येच राहणे हे सुरक्षित पर्याय असते.
कार कंपन्यांना सेफ्टी फीचर्सवर द्यावे लागणार बारीक लक्ष! लवकरच येऊ शकतो BNCAP 2.0
धुक्यात गाडी चालवताना येलो लाईटचा वापर फायदेशीर ठरतो. पांढरा प्रकाश धुक्यात परावर्तित होऊन दृष्टी आडवतो, तर येलो लाईट धुक्यातील दृश्यमानता वाढवतो. जर वाहनात येलो लाईट नसतील तर हेडलाइट्सवर येलो ट्रान्सपेरेंट शीट बसवू शकता. अनेक चालक धुक्यात गाडी चालवताना हाय बीमचा वापर करतात, पण ही अत्यंत चुकीची सवय आहे. हाय बीममुळे समोरचा रस्ता अजून धूसर दिसतो.
याशिवाय, फॉग लाईट्सचा वापर, विंडशील्ड स्वच्छ ठेवणे, डीफॉगर सुरू ठेवणे, आणि इंडिकेटर्सचा योग्य वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे सर्व उपाय केल्यास धुक्यात वाहन चालवत असताना अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
Ans: धुक्यात गाडीचा वेग शक्य तितका कमी ठेवावा, जेणेकरून अचानक ब्रेक लागल्यास नियंत्रणात ठेवता येईल.
Ans: विजिबिलिटी कमी असल्यामुळे समोरून किंवा बाजूने येणारे वाहन दिसत नाही; त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.
Ans: किमान १०० मीटर अंतर सुरक्षिततेसाठी आवश्यक असते.
Ans: होय, हे धुक्यात दृश्यमानता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.






