अमेरिकन परतू लागले घरी! Thanksgiving मुळे रस्त्यावर लागल्या लांबच लांब गाड्यांच्या रांगा, काय आहे ही परंपरा? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेत थॅंक्सगिव्हिंग डे दिवशी सगळे कुटुंब एकत्र येऊन जुन्या गोष्टीं, परंपरा आठवतात. एकमेकांचे गेल्या वर्षासाठी आभार मानतात. सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण असते. ही परंपरा नेमकी काय आहे हे आपण आज जाणून घेऊयात.
थँक्सगिव्हिंग डे हा युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये साजरा केला जातो. हा सण कृतज्ञता, कुटुंब आणि ऐक्याच्या भावनेवर आधारित आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी लोक आपल्या कुटुंबासोबत एकत्र येतात आणि आनंद साजरा करता. एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. खास कार्यक्रमांचे, पार्टीचे आयोजन केले जाते.
हा सण १६२१ पासून प्लायमाउथामध्ये राहणाऱ्या यात्रेकरुंनी सुरु केला होता. याचा उद्देश शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आहे. यादिवशी रात्री एकत्री जेवणाचे आयोजन केले जाते. पंरुत वॉशिंग्टनमध्ये हा दिवस १७८९ मध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता. या दिवशी अमेरिकेत आणि कॅनडात देशभरातील लोकांना राष्ट्रीय सुट्टी असते. १९४१ मध्ये हा दिवस नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी साजरा केला जाऊ लागला.
आजच्या दिवशी जगभरातील सर्व अमेरिकन आपल्या कुटुंबाकडे परततात. तसेच या दिवशी सर्व बॅंका, सरकारी कार्यलये, पोस्ट ऑफिस बंद असतात. या दिनानिमित्त चार दिवसांची सुट्टी असते. या काळात लोक डिसेंबरमध्ये येणाऱ्या ख्रिसमस हंगामासाठी खरेदी करतात. या दिवशी अमेरिकेत वेगवेगळ्या रॅलींचे, सामन्यांचे, परेडचे, टर्की डिनरचे आयोजन केले जाते.
अमेरिकेत या दिवशी सर्व घरांमध्ये विशेष डिनरचे आयोजन असते. यामध्ये रात्रीच्या जेवनात टर्की, स्टफिंग, मॅश केलेले बटाटे, क्रॅनबेपी सॉस, हिरव्या बीन कॅसरोल, भोपळा, पेकन किंवा सफरचंद अशा पदार्थांचा समावेश असतो. लोक एक येऊन फुटबॉल खेळतात, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात. यानिमित्त गरजू लोकांना अन्न वाटप देखील केले जाते.
दरम्यान या आजच्याच दिवशी जगभरातील अमेरिकन आपल्या देशात परतत असतात, तसेच अमेरिकेतील परेड्स, रॅली यांमुळे ४०५ फ्रीवेवर होते ट्रॅफिक जाम होते. हे अमेरिकेतील सर्वात मोठे ट्राफिक जाम असते. सध्या याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला पाकिस्तान; अंदाधुंद गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी ठार
Ans: अमेरिकेत थॅंक्सगिव्हिंग डे दिवशी सगळे कुटुंब एकत्र येऊन जुन्या गोष्टीं, परंपरा आठवतात. एकमेकांचे गेल्या वर्षासाठी आभार मानतात. जो त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे.
Ans: दरवर्षी अमेरिका आणि कॅनडामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी थॅंक्सगिव्हिंग डे साजरा केला जातो.
Ans: Thanksgiving Day दिवशी अमेरिकेतील कुटुंब एकत्र येतात. खास पार्टीचे, डिनरचे, परेड, रॅलीचे आयोजन या दिवशी केले जाते.
Ans: अमेरिकेत Thanksgiving Day निमित्त चार दिवसांच्या सुट्ट्या दिल्या जातात.
Ans: अमेरिकेत Thanksgiving Day दिवशी सर्व बॅंका, सरकारी कार्यलये, पोस्ट ऑफिस बंद असतात.






