लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिने अभिनेत्री प्राजक्ता माळीवरील आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये सध्या बीड हत्या प्रकरण व परभणी प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप करताना त्यांनी चित्रपटविश्वातील त्यांनी अभिनेत्रींची नावे देखील घेतली होते. यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने प्राजक्ता माळी हिची बाजू घेऊन भूमिका मांडली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यावर आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केल्यानंतर तिने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा प्राजक्ता माळीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. तसेच सुरेश धस यांनी लोकप्रतिनिधी असताना केलेले हे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचे म्हणत जाहीर माफी मागण्याचे प्राजक्ता माळी म्हणाली आहे. तसेच कोणताही पुरावा नसताना हे गंभीर आरोप केले जात असल्याचे म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला अश्रू अनावर झाले.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या प्रकरणावर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये ती प्राजक्ता माळी हिच्या समर्थनार्थ भूमिका घेत आहे. गौतमी पाटील म्हणाली की, “प्राजक्ता तू जे काही बोललीस ते सर्व बरोबर होतं. आम्ही सर्व कलाकार तुझ्यासोबत आहोत. मी देखील एक कलाकार आहे. त्यामुळे मलाही तुम्हाला विनंती करायची की एखाद्या कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या, त्याला कोणत्याही नेत्यासोबतच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीसोबत त्याचे नाव जोडू नका. तुम्ही कलाकाराला सपोर्ट करा. तुम्ही कलाकाराच्या पाठीमागे उभे राहा. तुम्ही प्रेक्षक आमच्यावर प्रेम करता. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. तू या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नको. तू अशीच पुढे जात राहा. हसत राहा आणि खूप छान राहा,” असे गौतमी पाटील म्हणाली आहे.
प्राजक्ता माळी काय म्हणाली?
राजकीय वर्तुळामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबच चर्चा सुरु झाल्यानंतर प्राजक्ता माळी हिने आपली भूमिका स्पष्ट करुन सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावर बोलणार असल्याचे देखील प्राजक्ता माळी म्हणाली आहे. तसेच एका राजकीय व्यक्तीशिवाय कलाकार करिअर स्वबळावर आणि मेहनत घेऊन बनवू शकत नाही का? असा सवाल अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने उपस्थित केला.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली की, “परळीला कधीच पुरुष कलाकार गेला नाही का हो, कार्यक्रमाला. त्यांची नावे का येत नाहीत. इव्हेंट मॅनेजमेंटचं सांगायचं तर पुरुष कलाकारांचं नाव घेतात. महिला कलाकार छोट्या कुटुंबातून येऊन संघर्ष करतात. पुढे येतात. आणि तुम्ही असं बोलून त्यांचं नाव डागळता. या आधीही प्रथितयश नेत्यांबरोबर फोटो आहेत. मान्यवरांबरोबर फोटो आहेत. त्या फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कुणाही बरोबर नाव जोडणार का? महाराष्ट्रातील राजकारण्यांना ही गोष्ट शोभत नाही” असं स्पष्ट मत प्राजक्ता माळी हिने व्यक्त केले आहे.