मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर गणपती बसवला (फोटो - सोशल मीडिया)
Maratha Reservation : मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मराठा आरक्षणाची हाक दिली आहे. चलो मुंबईचा नारा देत जरांगे पाटील हे अंतरवली सराटीपासून मुंबईमध्ये दाखल झाले. कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर आणि सरकारच्या परवानगीने जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मिळाली आहे. जरांगे पाटील यांना केवळ एका दिवसाची आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावेळी हजारो समर्थक हे आझाद मैदानामध्ये दाखल झाले असून मुंबईच्या रस्त्यांवर मराठा समाजाची लाट दिसून येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर 5 हजार आंदोलकांसह आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानंतर आता जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी बसले आहेत. मराठा आरक्षणाची हाक जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरुन दिली आहे. मात्र त्यापूर्वी जरांगे पाटील यांनी मंचावर गणपती देखील बसवला आहे. मराठा समाजाच्या हक्कासाठी लढा देताना जरांगे पाटील यांन श्रद्धा देखील राखली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यातील गणेशोत्सव हा अत्यंत लोकप्रिय आहे. यामध्ये मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी संपूर्ण देशभरातून भाविक येत असतात. यामुळे मुंबईमध्ये गणेशोत्सावाची मोठी धामधुम असते. यामध्येच जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आंदोलन पुकारल्यामुळे पोलिसांवर देखील अतिरिक्त भार आला आहे. गणेशोत्सावामध्ये जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन करणे हे योग्य नसल्याचे देखील भाजप नेते म्हणाले होते.
यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर गणपती बसवला आहे. गणपती बाप्पाला पुष्पाहार अर्पण करत जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे पाटील यांनी सरकारकडे बेमुदत उपोषणाच्या परवानगीची मागणी केली आहे. , ह्याच ठिकाणी उपोषण करून मेलो तरीही, मराठ्यांच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय राहणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनोज जरांगे पाटील यांनी मंचावर गणराय विराजमान करुन मोठी खेळी खेळली आहे. जरांगे पाटील यांनी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी गणपतीची मूर्ती ठेवली. मनोज जरांगे मुंबई येण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मनोज जरांगे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आल्यास मोठी अडचण होईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे देखील भाजप नेते म्हणाले होते. आंदोलनामुळे हिंदुंच्या सणात विघ्न येईल, असा मुद्दाही उपस्थित केला जात होता. मात्र, मनोज जरांगे यांनी आम्ही मुंबईत गणेशोत्सवाला कोणतेही गालबोट लागू देणार नाही, असे आश्वासन दिले. यानंतर जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी गणरायाची मूर्ती बसवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी गणरायाची मूर्ती ठेवण्यात आली. तसेच गणपतीची आरती करण्यात आली. यामुळे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी लढा देताना श्रद्धा देखील राखली आहे.