Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MCA निवडणुकीची रणधुमाळी! शरद पवारांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा 'वर्षा' (Varsha) निवासस्थानी भेट घेतली. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या भेटीचा तपशील गुलदस्त्यात असला तरी...

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 25, 2025 | 06:29 PM
शरद पवारांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग (Photo Credit- X)

शरद पवारांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • जितेंद्र आव्हाड आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘वर्षा’वर ४० मिनिटे चर्चा
  • वानखेडे स्टेडियमवर शरद पवार
  • आशिष शेलार यांची तासभर गुप्त बैठक
मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा ‘वर्षा’ (Varsha) निवासस्थानी भेट घेतली. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या भेटीचा तपशील गुलदस्त्यात असला तरी, १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एमसीए निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची जोरदार चर्चा आहे.

पवार आणि शेलार गटात गुप्त बैठका

आव्हाड आणि फडणवीस यांच्या भेटीपूर्वी, एमसीएच्या राजकारणातील दोन मोठे गट असलेल्या शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात वानखेडे स्टेडियमवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते.

Satara Doctor Case: “मुख्यमंत्र्यांना दोन पदे झेपत नसतील तर राजीनामा…”, यशोमती ठाकूर यांची फडणवीसांवर टीका!

यावेळी त्यांची भाजप नेते आशिष शेलार यांच्याशी २० मिनिटे चर्चा झाली. मागील एमसीए निवडणुकीत पवार आणि शेलार गट एकत्र आले होते, त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या चर्चेनंतर पवार, आव्हाड, अजिंक्य नाईक आणि मिलिंद नार्वेकर यांची गरवारे क्लब येथे पुन्हा दीर्घ बैठक पार पडली.

आव्हाड थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

गरवारे क्लबमधील बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्यासोबत एकाच गाडीतून निघाले आणि रात्री १० वाजता थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचले. या भेटीत एमसीए निवडणुकीतील संभाव्य उमेदवार आणि राजकीय डावपेचांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटींच्या सत्रामुळे आगामी एमसीए निवडणुकीसाठी जोरदार तयारी आणि राजकीय डावपेच  सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

Maharashtra Politics: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारकडून दिलासा योजनांची घोषणा

Web Title: Mca election battle after discussing with sharad pawar jitendra awhad directly meets chief minister fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 06:29 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Jitendra Awhad
  • MCA
  • Mumbai
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास
1

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास

“न्यायमूर्ती स्वामीनाथन विरोधातील महाभियोगाला समर्थन म्हणजे हिंदूंचा अपमान”, शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश
2

“न्यायमूर्ती स्वामीनाथन विरोधातील महाभियोगाला समर्थन म्हणजे हिंदूंचा अपमान”, शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
3

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा

मुख्यमंत्र्यांच्या प्रचारापासून अग्निशमन वाहन हेलिपॅडवरच; लोहा नगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार आला चर्चेत
4

मुख्यमंत्र्यांच्या प्रचारापासून अग्निशमन वाहन हेलिपॅडवरच; लोहा नगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार आला चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.