Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Protest : “भाड्याची माणसं आणून रस्ते जाम…हा जगातील निर्लज्जपणा: MP संजय राऊतांचे टीकास्त्र

Political News : वरळी डोममध्ये भाजपच्या मोर्चाविरोधात एका महिलेने आक्रमक भूमिका घेतली. यावरुन खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 22, 2026 | 11:29 AM
Sanjay Raut, ShivSena UBT, Narendra Modi, Prajakt Tanpure,

Sanjay Raut, ShivSena UBT, Narendra Modi, Prajakt Tanpure,

Follow Us
Follow Us:
  • वरळी डोममध्ये गिरीश महाजन यांच्याविरोधात महिलेची आक्रमक भूमिका
  • खासदार संजय राऊतांनी दिली खास प्रतिक्रिया
  • भाड्याने माणसं आणून रस्ता जाम केल्याची टीका
 

Maharashtra Politics : मुंबई : लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळे सत्ताधारी भाजप आक्रमक झाले आहे. विरोधकांविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून देशव्यापी आंदोलन सुरु केले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडून (BJP Politics) रस्त्यावर ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहेत. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतील वरळी डोम येथे भाजपच्या आंदोलनामुळे एका महिलेने मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. रस्त्यावर एक तास थांबावं लागल्यामुळे महिलेचा संताप झाला होता. यावरुन आता विरोधकांनी निशाणा साधला.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या या आंदोलनांवर त्यांनी सडकून टीका केली आहे. गिरीश महाजनांविरोधात महिलेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राऊत म्हणाले की, हा महिलांचा विद्रोह आहे . खोटे बोलताय. भाड्याची माणसे आणून रस्ते जाम करताय. भाजपने ढिसाळघाईने मोर्चा काढला त्याविरोधात हा आक्रोश आहे. भाजपच्या या मोर्चामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचीच संख्या जास्त होती, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हे देखील वाचा : ‘काँग्रेस फक्त प्रियांका गांधीच चालवू शकतात, त्या इंदिरा गांधींसारख्या’; बिहारच्या माजी मंत्र्याचं मोठं विधान

पुढे ते म्हणाले की, “सर्वत्र सत्ता तुमची आहे तरी आंदोलन करत आहेत . सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाविरुद्ध काढलेला हा पहिला मोर्चा. त्यांचा जांभोरीवर सत्कार करायला हवा. हा जगातील पहिला निर्लज्जपणा. असा मोर्चा काढणाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे,” असा टोला खासदार राऊतांनी लगावला.

८५० हा आकडा खरात बाबाने दिला आहे का?

पुढे खासदार राऊत आरक्षण लागू करणे हे तुमच्या हातात असल्याचे भाजपला सुनावले. “३३ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करा. यासाठी तुम्हाला ट्रम्पला विचारायचे आहे की पुतीनला. महिला आरक्षणाला यांचाच विरोध आहे. ८५० जागा झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू करणार नाही ही अट कशासाठी. हे कुठल्या संविधानात आहे. ८५० हा आकडा खरात बाबाने दिला आहे का?. त्यामुळे ते या आकड्यावर चिकटून बसले आहेत. ५४३ वर करा ना. त्यांची ठासलीय लोकांनी. १५०० रूपये बंद होईल तेव्हा नारीशक्ती कुठल्या बाजूने आहे ते समजेल,” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

हे देखील वाचा : बारामतीत पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा रुग्णालयातून ‘मास्टरस्ट्रोक’

त्या प्रचाराला गेल्या आमच्याशी सगळ्यांशी बोलून गेल्या

बारामती पोटनिवडणुकीच्या सांगता सभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या. सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने निवडणून देण्याचे आवाहन सुप्रिया सुळेंनी केले. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “सुप्रिया सुळे या कौटुंबिक कारणास्तव सभेमध्ये सहभागी झाल्या. सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत. अजित पवार त्यांचे भाऊ आहेत त्या प्रचाराला गेल्या आमच्याशी सगळ्यांशी बोलून गेल्या. इतर सर्व कशाला निमंत्रण दिलं होतं पण, आमच्या सगळ्यांच्या वतीने सुप्रियाताई गेल्या. दुसरा प्रश्न माननीय शरद पवार साहेब एखाद्याची प्रकृती बरी नसेल काही उपचार सुरू असतील काही शस्त्रक्रिया झाल्या असतील अशा वेळेला तुमचा प्रश्न कसा करता यावा ते का जात नाहीत त्याने स्वतः एक निवेदन केला आहे त्या संदर्भात त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

Web Title: Mp sanjay raump sanjay raut live marathi on bjp protest in worli dome on women reservation bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nari Shakti Vandan
  • sanjay raut
  • Women Reservation Bill

संबंधित बातम्या

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
1

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
2

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी
3

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
4

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.