देवा आता तूच सांग या जाहिरातीमधून शरद पवार गटाने मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचल आहे (फोटो - सोशल मीडिया)
NCP Advertisement on Devabhau : नाशिक : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी नेत्यांकडून जोरदार कॅम्पेन राबवले जात आहे. याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी देखील पॉलिटिकल कॅम्पेन राबवले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्यात आले आहे. यलो कलरमध्ये जाहिरात देऊन सूचक विधान करत शरद पवार गटाने जोरदार हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सर्व प्रमुख वर्तमान पत्रांना पहिल्या पानावर जाहिरात देण्यात आली आहे. पिवळ्या रंगामध्ये असणारी ही जाहिरात लक्षवेधी ठरत आहे. यामध्ये ‘देवा भाऊ नंतर देवा आता तूच सांग’ असे लिहिण्यात आले आहे. मध्यभागी असणारा हा मथळा लक्षवेधी ठरत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नाशिकमध्ये शरद पवार गटाकडून एकदिवसीय शिबिर होत आहे. त्याचबरोबर आक्रोश मोर्चा देखील काढला जाणार आहे. त्यापूर्वी सर्व प्रमुख वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात छापण्यात आली आहे. या जाहिरातीतील मजकूर आणि मांडणीवरून फडणवीस यांना उपरोधिक टोला लगावण्यात आला आहे. या जाहिरातीमध्ये शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमान, पिकाला हमीभाव, भावांतर योजना, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, रोजगार, कांदा निर्यात बंदी आदी विविध मुद्यांकडे जाहिराताच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे स्वार्थी सरकार पुरस्कृत ग्रहण कधी सुटणार असा सवाल देखील या जाहिरातीमधून मांडण्यात आला आहे.
पोशिंद्याच्या प्रश्नांसाठी, लढा बळीराजासाठी…
‘भव्य आक्रोश मोर्चा’त मोठ्या संख्येने सहभागी व्हा…
🗓️सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ । सकाळी १०:३० वा. | 📍 गोल्फ क्लब मैदान, नाशिक pic.twitter.com/aOQs2CO3fp
— Supriya Sule (@supriya_sule) September 14, 2025
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून थेट देवा भाऊ तूच सांग असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धऱण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी महायुतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत देवाभाऊ म्हणून पॉलिटिकल कॅम्पन करण्यात आले. याचे प्रत्युत्तर देत प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी शरद पवार गटाने जोरदार जाहिरातबाजी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजपकडून करण्यात आलेल्या जाहिरातबाजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांना फुले अर्पण करत होते. देवाभाऊ लिहित हे पॉलिटिकल कॅम्पन राबवण्यात आले. सर्व प्रमुख वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर देंवेंद्र फडणवीस यांचा फोटो देण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे ही जाहिरात कोणी दिली होती त्यांचे नाव देण्यात आले नव्हते. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांचा सूचक फोटोची जाहिरातबाजी केल्यामुळे जोरदार राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली होती. यालाच आता शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणासाठी आता पिवळा रंग हा शरद पवार गटाकडून वापरण्यात आला आहे.