Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे गटात प्रवेशापूर्वीच ‘गेम’ झाला? Omraje Nimbalkar यांच्यामुळे भाजपचे बसवराज पाटील विजयी?

धाराशिव-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीवर आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवरून विधान परिषदेतील निकाल फिरला आहे का असा प्रश्न उभा राहत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 22, 2026 | 12:01 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

ठाकरे गटांत झालेला बंड आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर दिसून आले आहे. त्याचा सर्वात मोठा परिणाम तो म्हणजे विधान परिषदेचा निकाल. सोमवारी राज्यातील विधानपरिषदेच्या 17 पैकी 11 जागांवरील निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यानिकालात एकतर्फी विजय हा महायुचीचा झालेला पहायला मिळाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धाराशिव- लातूर मतदारसंघात याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसला. हा मतदारसंघ खासदार ओमराजे निंबाळकरांचा आहे. फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विधान परिषद निवडणुकीत धाराशिव-लातूर मतदारसंघात महाविकास आघाडीला दगा दिल्याचे समोर आले आहे.

राज्यात भाजपचा जलवा कायम; विधान परिषद निकालाने शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या, काँग्रेस-शिवसेनेची कामगिरी कशी राहिली?

धाराशिव-लातूरमध्ये मविआचा आधीच गेम झाला?

धाराशिव-लातूर- बीड विधान परिषद मतदारसंघातून भाजपचे बसवराज पाटील रिंगणात उतरले होते तर काँग्रेसकडून महेश देशमुख विरोधात उभे होते. पण इथे वेगळीच खेळी पाहायला मिळाली. भाजपचे बसवराज पाटील यांचा विजयी झाला आहे. तर काँग्रेसच्या महेश देशमुख यांचा पराभव झाला. या निकालावर नजर टाकल्यास याठिकाणी महाविकास आघाडीची मतं फुटल्याचे स्पष्ट दिसत आहे. ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याची घोषणा केली खरी पण त्यांचा हा निर्णय अगोदरच झालेला असल्यचा दिसून येत आहे. कारण हा निकाल या सगळ्यासाठी महत्त्वाचा बाजू मांडून गेला. जरी त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं असलं की माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून मी शिंदे गटात जायचे की नाही, हा निर्णय घेईन पण इथे डाव वेगळाच निघाला आहे. 18 जूनला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधील आपली सर्व मतं भाजपच्या बसवराज पाटील यांच्याकडे वळवल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

किती मत्ताधिक्याने विजयी?

धाराशिव-लातूर- बीड विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार बसवराज पाटील यांना 845 मतं मिळाली आहेत. तर 14 मतपत्रिका कोऱ्या होत्या. 14 मतं बाद ठरली. काँग्रेसच्या महेश देशमुख यांना फक्त 124 मतं मिळाली. त्यामुळे भाजपच्या बसवराज पाटील यांचा 721 मतांनी दणदणीत विजय मिळाला. हा राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने झालेला विजय मानला जात आहे. ओमराजे निंबाळकर यांनी दगाफटका केल्यामुळे या निवडणुकीत मविआची तब्बल 150 मतं फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तब्बल 150 मतं फुटल्याचा अंदाज

धाराशिव-लातूर- बीड विधान परिषद निवडणुकीत बसवराज पाटील यांना 845 मतं मिळाली आहेत. 14 मतपत्रिका कोऱ्या होत्या. तर 14 मतं बाद ठरली. काँग्रेसच्या महेश देशमुख यांना फक्त 124 मतं मिळाली. त्यामुळे भाजपच्या बसवराज पाटील यांचा 721 मतांनी विजय झाला. हा राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने झालेला विजय आहे. ओमराजे निंबाळकर यांनी दगाफटका केल्यामुळे या निवडणुकीत मविआची तब्बल 150 मतं फुटल्याचा अंदाज आहे.

कार्यकर्त्यांकडून ओमराजेंना दिली होती भावनिक साद

ओमराजे यांनी निधी हवा असेल तर आम्ही आमच्या किडन्या विकू, असा प्रकारचं भावनिक आवाहन तेथील शिवसैनिकांनी केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ओमराजे आमची शेवटची आशा असून त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये असंही मातोश्रीवरील वातावरण होतं. यासगळ्या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील तसेच धाराशिव- लातूर विधानपरिषदेचे वारे फिरले असल्याचं समोर येत आहे.

ऑपरेशन टायगरला धक्का? ओमराजे-आष्टीकरांच्या घोषणेमुळे सहा खासदारांची सदस्यता धोक्यात

Web Title: Omraje nimbalkar cross voting bjp basavraj patil win dharashiv latur see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Assembly Election
  • Dharashiv
  • Mp Omraje Nimbalkar
  • Operation Tiger
  • shivsena

संबंधित बातम्या

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
1

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा
3

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
4

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.