Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : महा-राजकीय भूकंप! शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये; विखे पाटलांची ‘डबल स्ट्राईक’ चर्चा

अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रमुख नेते प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 30, 2026 | 04:32 PM
महा-राजकीय भूकंप! शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये; विखे पाटलांची ‘डबल स्ट्राईक’ चर्चा

महा-राजकीय भूकंप! शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये; विखे पाटलांची ‘डबल स्ट्राईक’ चर्चा

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगरमध्ये विखेंचा ‘डबल स्ट्राईक’
  • प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश
  • अक्षय कर्डीले यांच्या विजयानंतर शरद पवार गटाचे जिल्ह्यात पानिपत!
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्याच्या आणि पर्यायाने राज्याच्या राजकारणाला एक अत्यंत कलाटणी देणारा आणि विरोधी पक्षांना चक्रावून सोडणारा महा-राजकीय भूकंप आज मुंबईत झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्ह्यातील प्रमुख नेते, माजी राज्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सख्खे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य पुढाकाराने आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा हाय-व्होल्टेज पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

एकीकडे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डीले यांचा दणदणीत विजय झालेला असतानाच, दुसरीकडे महाविकास आघाडीचा जिल्ह्यातील सर्वात मोठा चेहरा असलेल्या प्राजक्त तनपुरेंनी हातात ‘कमळ’ घेतल्यामुळे विखे पाटलांनी जिल्ह्यात ‘डबल स्ट्राईक’ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तनपुरेंना मिळणार विधान परिषदेची लॉटरी?

राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्त तनपुरे यांचा हा प्रवेश केवळ साधे पक्षांतर नसून त्यामागे मोठी राजकीय गणिते आहेत. तनपुरे यांची विधान परिषदेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून प्रभावी काम केलेल्या तनपुरेंच्या भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शरद पवार गटाची मोठी पडझड झाली असून, जिल्ह्यात पक्षाला मोठे नेतृत्वच उरले नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

“…तर आमचा समाज पेटून उठेल,” जरांगे पाटलांच्या आंदोलनावर बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा, ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार?

६ महिन्यांचे ‘सिक्रेट ऑपरेशन’ आणि विखेंची अचूक रणनीती

या संपूर्ण राजकीय महानाट्याचे पडद्यामागचे खरे सूत्रधार माजी खासदार आणि भाजपचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील हेच असल्याचे आता समोर आले आहे. हा प्रवेश अचानक झालेला नसून, अत्यंत शांतपणे आणि गुप्तपणे आखलेल्या रणनीतीचा भाग होता.

संवादाची दारे खुली

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या तब्बल ६ महिने आधीपासूनच डॉ. सुजय विखे पाटील हे प्राजक्त तनपुरे यांच्या थेट संपर्कात होते.

पोटनिवडणुकीतून माघार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर तनपुरे यांनी राहुरीची पोटनिवडणूक न लढवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. तो निर्णय म्हणजे या भाजप प्रवेशाची पहिली नांदी होती.

अक्षय कर्डीले यांच्या विजयाचे ‘किंगमेकर’- डॉ. सुजय विखे

राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचा भगवा फडकवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी रात्रीचा दिवस केला होता. अक्षय कर्डीले यांना पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यापासून ते त्यांना थेट विधानसभेत पाठवण्यापर्यंतची संपूर्ण सूत्रे सुजय विखे यांच्याच हातात होती.

११ पेक्षा जास्त झंझावाती सभा

सुजय विखेंनी केवळ राहुरीच नाही, तर नगर आणि पाथर्डी मतदारसंघातील पक्ष संघटना आणि नाराज कार्यकर्त्यांना एकत्र बांधत ११ हून अधिक प्रभावी जाहीर सभा घेतल्या. स्वतः मैदानात उतरून त्यांनी विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावले आणि अक्षय कर्डीले यांच्यासाठी निर्णायक विजयाचे वातावरण तयार केले.

विखेंचा हा ‘डबल स्ट्राईक’ विरोधकांसाठी धोक्याची घंटा का?

जिल्ह्याच्या राजकारणात विखे विरुद्ध तनपुरे-गडाख-पवार असा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो. मात्र, डॉ. सुजय विखे पाटील यांनी एकाच वेळी दोन मोठे मासे गळाला लावले आहेत.

Rahul Gandhi Criticized PM Modi: ’विश्वगुरूंचे दावे करता, पण एक परीक्षा नीट घेता येत नाही’… ; राहुल गांधींचा हल्लाबोल

पहिला फटका:- राहुरीत स्वतःचा हक्काचा माणूस अक्षय कर्डीले आमदार केला.
दूसरा फटका:- ज्यांच्याशी राजकीय लढत होती, त्या मूळ विरोधी नेत्यालाच प्राजक्त तनपुरे आपल्या तंबूत ओढले.
यामुळे आता राहुरी, पाथर्डी आणि नगर तालुक्यात भाजपला आव्हान देणारा सक्षम विरोधी चेहराच शिल्लक राहिलेला नाही. डॉ. सुजय विखे पाटील यांनी अचूक टायमिंग साधत जिल्ह्यात शरद पवार गटाचे पारडे पूर्णपणे रिकामे केले आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांवर या महा-बदलाचा थेट प्रभाव पडणार, हे आता निश्चित झाले आहे.

Web Title: Prajakt tanpure joins bjp ahilyanagar political earthquake jayant patil ncp sp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • BJP
  • jayant patil
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Maharashtra Politics:अजित पवारांच्या पक्षापेक्षा थेट भाजप…! शरद पवारांची राष्ट्रवादी NDA च्या दिशेने? पडद्यामागे मोठ्या हालचाली
1

Maharashtra Politics:अजित पवारांच्या पक्षापेक्षा थेट भाजप…! शरद पवारांची राष्ट्रवादी NDA च्या दिशेने? पडद्यामागे मोठ्या हालचाली

मोठी बातमी ! फडणवीसांच्या ‘वर्षा’वर भाजप कोअर कमिटीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा ?
2

मोठी बातमी ! फडणवीसांच्या ‘वर्षा’वर भाजप कोअर कमिटीची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा ?

Arvind Sawant: ‘ज्या महिलांनी सत्तेवर आणलं, त्यांचीच नावं…’, लाडकी बहीण योजनेवरून अरविंद सावंत सरकारवर कडाडले
3

Arvind Sawant: ‘ज्या महिलांनी सत्तेवर आणलं, त्यांचीच नावं…’, लाडकी बहीण योजनेवरून अरविंद सावंत सरकारवर कडाडले

अहिल्यानगरमध्ये ‘विद्रोही’चे दोन दिवसीय ‘नवसमाजमाध्यम’ शिबिर उत्साहात संपन्न; नवमाध्यमांचा लोकशाहीसाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन
4

अहिल्यानगरमध्ये ‘विद्रोही’चे दोन दिवसीय ‘नवसमाजमाध्यम’ शिबिर उत्साहात संपन्न; नवमाध्यमांचा लोकशाहीसाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.