Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar News: रोहित पवारांच्या जिवाला धोका कुणाकडून; नेमकं चाललंय काय?

अजित पवार यांच्या मृत्यू अपघात  होता की  घातपात, याबाबत रोहित पवार यांनी दोनदा पत्रकार परिषद घेऊन काही  महत्त्वाचे मुद्दे निदर्शनास आणले आहेत. त्यात त्यांनी काही पुराव्यासह बाजूही मांडल्या.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 20, 2026 | 11:20 AM
Rohit Pawar, Ajit pawar plane crash conspiracy, ajit pawar eath Mystery

Rohit Pawar, Ajit pawar plane crash conspiracy, ajit pawar eath Mystery

Follow Us
Follow Us:
  • २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
  • रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेद्वारे काही महत्त्वाचे पुरावे सादर केले आहेत. त्यांनी VSR विमान कंपनीचे मालक आणि काही मोठ्या राजकीय नेत्यांचे संबंध असल्याचा दावा केला आहे.
  • या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी रोहित पवार ज्या आक्रमकतेने तपास लावून धरत आहेत, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती पवार कुटुंबाने व्यक्त केली आहे
 Ajit Pawar Death Mystery  :  बारामती विमानतळावर २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेला आता तीन आठवडे उलटले असले, तरी हा केवळ अपघात नसून एक नियोजित ‘घातपात’ असल्याचा संशय आमदार रोहित पवार सातत्याने व्यक्त करत आहेत.  रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुराव्यांची मालिका आणि घटनाक्रम सादर करत थेट वैमानिकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर केवळ रोहित पवारच नव्हे, तर खासदार सुप्रिया सुळे आणि अजितदादांचे चिरंजीव जय पवार यांनीही या प्रकरणातील संशयास्पद बाबींकडे लक्ष वेधले आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणात काही उच्चपदस्थ व्यक्तींचा समावेश  असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या सदर्भातील अनेक गुपितेदेखील त्यांच्याकडे असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे  दिवसेंदिवस या प्रकरणातील गुढ वाढत चालले आहे.

Rahul Gandhi Threat Case: राहुल गांधींसह २५ खासदारांना धमकी देणाऱ्या राज सिंह आमेराला कोटामधून

रोहित पवार ज्या आक्रमकतेने या प्रकरणाचा तपास लावून धरत आहेत आणि मोठ्या नावांचा उल्लेख करत आहेत, त्यावरून पवार कुटुंबाने आता चिंता व्यक्त केली आहे. ही सत्य परिस्थिती समोर आणण्याच्या भूमिकेमुळे रोहित पवार यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांच्या कुटुंबीयांनी बोलून दाखवली आहे.

  • वैमानिकाच्या माध्यमातून हा घातपात घडवून आणला गेला का, असा प्राथमिक संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
  • अपघाताच्या दिवसाचा घटनाक्रम पाहता, हे सर्व आधीच ठरलेले होते का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
  • या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून, निष्पक्षपाती तपासासाठी दबाव वाढत आहे.
अजित पवार यांच्या मृत्यू अपघात  होता की  घातपात, याबाबत रोहित पवार यांनी दोनदा पत्रकार परिषद घेऊन काही  महत्त्वाचे मुद्दे निदर्शनास आणले आहेत. त्यात त्यांनी काही पुराव्यासह बाजूही मांडल्या. विमान कंपनी VSR च्या कारभार  आणि कंपनीच्या गुंतवणूकदारांवरही सडकून टिका केली. कंपनीचा मालक कुठे फरार झाला आहे. त्याच्याशी कोणकोणत्या मोठ्या पक्षांच्यालोकांचे संबंध आहेत, याचेदेखली त्यांनी पुरावे दिले आहेत. तयाशिवाय एका खासादाराचीही या VSR विमान कंपनीत भागिदारी असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे किती दुरपर्यंत पसरले आहेत. याचेही विश्लेषण त्यांनी केलं आहे.

अजित पवार यांच्या विमान (Ajit Pawar Plane crash)  अपघाताचा तपासही अतिशय संथगतीने सुरू  आहे.  सुरुवातीला ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला, पण रोहित पवार यांच्या दुसऱ्या पत्रकार परिषदेनंतर मात्र कंपनी वठणीवर आल्याचे दिसत आहे, त्यानंतर कंपनीने ब्लॅक बॉक्समधील डेटाही डाऊनलोड केल्याचे सांगितले जात आहे.  रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सर्वसामान्य जनतेमध्येही हा  अपघात आहे की घातपात, यावरून शंका उपस्थित केल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा; राजकीय हालचालींना वेग 

रोहित पवारांना कुणाकडून धोका?

रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वरिष्ठ पदांवर बसलेले उच्चपदस्थ, तपास यंत्रणा आणि प्रशासनावर सातत्याने आरोप करत आहेत. त्यावरून त्यांच्या जिवालाही धोका असल्याचा सूर  पवार कुटुंबातून उमटू लागला आहे.  पण रोहित पवार यांच्या जिवाला नेमका कुणाकडून धोका आहे. याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पण रोहित पवार यांनी मात्र त्यंच्या कुटुंबाला धोका असल्याचा दावा केला आहे. पत्नी, मुले, आई, सासरे आणि इतर नतेवाईंकांसह आपल्या जिवाला धोका असल्याची भिती वाटत असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. पण त्याचवेळी आपण घाबरून प्रश्न विचारणे सोडून देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांनीही रोहित पवार यांना सरकारकडून सुरक्षा  देण्याची मागणी केली आहे. तर विमान अपघाताच्या बाबत येणाऱ्या अहवालांचा हट्ट धरला  आहे. संसदेत आम्ही  या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी,अशी मागणी आम्ही केली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Web Title: Rohit pawar news who is threatening rohit pawars life what is really going on

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Maharashtra Politics
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’
1

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
2

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!
4

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.