Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election 2026 : नेलपेंट रिमूव्हरने पुसली जातीये मतदानाची शाई; रोहित पवारांनी थेट शेअर केला VIDEO

तदारांच्या खुणेसाठी केली जाणारी मार्करची खूण ही सहज पुसली जात आहे. याचा व्हिडिओ शेअर करुन आमदार रोहित पवारांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 15, 2026 | 05:05 PM
Rohit Pawar shared video of indelible ink used for voting wiped with nail polish remover

Rohit Pawar shared video of indelible ink used for voting wiped with nail polish remover

Follow Us
Close
Follow Us:
  • मतदारांच्या बोटावरची शाई नेलपेंट रिमूव्हरने जाते पुसल्या
  • आमदार रोहित पवारांची शेअर केला व्हिडिओ
  • सत्ताधारी भाजपवर  साधला निशाणा
BMC Election 2026 : मुंबई : राज्यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Elections) मतदान प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील 29 पालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून उद्या निकाल हाती येणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मोठ्या उत्साहात मतदान पार पडत आहे. मात्र मतदानावेळी केल्या जाणाऱ्या शाईच्या खुणेवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. मार्करने केलेली खूण ही सहज निघून जात असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. याबाबत एक व्हिडिओ देखील समोर आला असून रोहित पवारांनी (Rohit Pawar) टीकास्त्र डागले आहे.

मतदारांच्या खुणेसाठी केली जाणारी मार्करची खूण ही सहज पुसली जात आहे. नेल पेंट रिमूव्हरने देखील ती पुसली जात आहे. यामुळे पालिका निवडणुकीतील विश्वासहर्ता आणि पारदर्शकता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. ही शाई पुसली जात असल्यामुळे दुबार मतदान होण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आली आहे. यामध्ये ही शाई पुसली जात असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. हा व्हिडिओ राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी देखील टीका केली आहे.

हे देखील वाचा : मीरा रोडमध्ये निवडणूक नियमांची पायमल्ली! भाजप एजंटने लावला उमेदवाराचा बॅच; घटनेचा Video व्हायरल

नेल पेंट रिमूव्हरने शाई पुसली जात असल्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, मतदानानंतर बोटाला लावलेली शाई अनेक दिवस तशीच रहात असल्याचं आतापर्यंतच्या अनेक निवडणुकींमध्ये बघितलंय… पण आज ही लावण्यात आलेली शाई लगेचच पुसली जात असून अशा प्रकारची शाई वापरणं म्हणजे दुबार आणि बोगस मतदानासाठी निवडणूक आयोगानेच लावलेला हा हातभार नाही का? की बोगस मतदानाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी महाशक्तीच्या दबावातून अशी शाई वापरण्यात आली की या शाईमध्येही भ्रष्टाचार झाला? याचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा. तसंच अनेक ठिकाणी दुबार मतदार असूनही तिथं डबल स्टार दिसत नाही, याचा अर्थ काय? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

मतदानानंतर बोटाला लावलेली शाई अनेक दिवस तशीच रहात असल्याचं आतापर्यंतच्या अनेक निवडणुकींमध्ये बघितलंय… पण आज ही लावण्यात आलेली शाई लगेचच पुसली जात असून अशा प्रकारची शाई वापरणं म्हणजे दुबार आणि बोगस मतदानासाठी निवडणूक आयोगानेच लावलेला हा हातभार नाही का? की बोगस मतदानाच्या… pic.twitter.com/2InMftEca9 — Rohit Pawar (@RRPSpeaks) January 15, 2026

त्याचबरोबर महाराष्ट्र कॉंग्रेसने देखील शाई पुसली जात असल्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर कॉंग्रेसने लिहिले आहे की, कधी नव्हे ते निवडणूकीत आज शाई ऐवजी मार्कर वापरल्या जातोय, तो मार्कर कसा पुसायचा यासाठी वेगवेगळे पर्याय अगोदरच सर्वांना माहिती आहेत, त्यामुळे एका मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर दूबार मतदार बोटावरील शाई नेलपेंट रिमुव्हर, विनेगर यांसारख्या वस्तूंचा वापर करून मिटवताहेत आणि पुन्हा दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदानासाठी उभे राहताहेत, ही खरेतर लोकशाहीची थट्टाच म्हणावी लागेल.

हे देखील वाचा : मतदानाऐवजी पुणेकरांची सिंहगडावर गर्दी; लोकशाहीपेक्षा विरंगुळ्याला पसंती?

आपल्या संविधानाने मतदानाचा समान अधिकार सर्वांना दिलेला आहे. कोणी उद्योगपती असो, पंतप्रधान असो की सामान्य नागरिक त्याला एकच मत देता येतं. पण आज खुलेआम दुबार तिबार मतदान होत असतील तर हा संविधानाने दिलेल्या अधिकाराचा अपमान नाही का ? आज निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने उघडपणे दूबार तिबार मतदान घडवून आणत असेल तर या निवडणूकांना अर्थ तो काय उरतो, या निवडणूका घेतल्या तरी का जात आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आला तर ते काही चूक नाही, असे मत कॉंग्रेसने व्यक्त केले आहे.

Web Title: Rohit pawar shared video of indelible ink used for voting wiped with nail polish remover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Election Commission
  • EVM Machine
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Municipal Elections 2026: राजकीय क्षेत्रातील ‘या’ दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा PHOTO
1

Municipal Elections 2026: राजकीय क्षेत्रातील ‘या’ दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा PHOTO

BMC Election 2026: बोगस मतदानाचे आरोप फालतू! नवाब मलिकांनी विरोधकांना सुनावले; मतदारांना केले ‘हे’ महत्त्वाचे आवाहन
2

BMC Election 2026: बोगस मतदानाचे आरोप फालतू! नवाब मलिकांनी विरोधकांना सुनावले; मतदारांना केले ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महापालिका मतदानात सर्वाधिक आघाडीवर; टक्केवारी वाचा सविस्तर
3

Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महापालिका मतदानात सर्वाधिक आघाडीवर; टक्केवारी वाचा सविस्तर

Maharashtra Politics: “… तर पोलिस ठोकून काढतील”; ठाकरेंच्या ‘भगवा गार्ड’वरून फडणवीस संतापले
4

Maharashtra Politics: “… तर पोलिस ठोकून काढतील”; ठाकरेंच्या ‘भगवा गार्ड’वरून फडणवीस संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.