Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांनी ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांनी पक्ष बळकट करण्यासाठी राज्यभर काम करणार असल्याचेही स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Jun 30, 2026 | 05:46 PM
'ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात'; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

'ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात'; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:

मुंबई : विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र‘ करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असताना, प्रवेशानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत अहिर यांनी ठाकरे गटावर थेट निशाणा साधला.

उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सचिन अहिर म्हणाले, “मी एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानतो. कोळशातून हिऱ्याची चमक दिसते आणि त्या हिऱ्याला जवळ करण्याची संधी मिळाली तर त्यातून विश्वास निर्माण होतो. शिंदे यांनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याला विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी संधी देऊन सामान्य कार्यकर्ताही मोठ्या पदावर जाऊ शकतो, हे दाखवून दिलं.”

‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’

उद्धव ठाकरे हे पक्षातील नेत्यांना सहज भेटत नाहीत, या आरोपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सचिन अहिर म्हणाले, “माझा तसा काही अनुभव नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन एकनाथ शिंदे काम करत आहेत, हेच त्यांचं सर्वात मोठं आकर्षण आहे. खासगीत अनेक लोकप्रतिनिधींना विचारा, तेही हेच सांगतील. असा नेता आपल्यासोबत असेल तर काम करण्याची ऊर्जा मिळते.”

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार

यावेळी त्यांनी ठाकरे गटातील काही नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत म्हटलं, “थोडा संयम ठेवायला हवा. पण ज्यांनी आयुष्यात कधी दगडही उचलला नाही, ते आज आम्हाला शिकवायला लागले आहेत.”

‘तळागाळातील कार्यकर्त्याला मोठी संधी दिली’

एकनाथ शिंदे यांचे आभार मानताना अहिर म्हणाले, “कोळशातून हिऱ्याची चमक दिसते आणि त्या हिऱ्याला जवळ करण्याची संधी मिळाली तर त्यातून विश्वास निर्माण होतो. शिंदे यांनी माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याला विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी संधी देऊन सामान्य कार्यकर्ताही मोठ्या पदावर पोहोचू शकतो, हे दाखवून दिले.”

ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सामान्य माणसासाठी काम केले. आता त्यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळातूनही लोकांसाठी काम करण्याची संधी मिळत आहे.”

Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी! सचिन अहिर यांनाच उमेदवारी देण्यामागे काय आहे रणनीती?

‘उपसभापतीपदाची गरिमा जपणार, पक्ष बळकट करणार’

उपसभापतीपदाच्या जबाबदारीबाबत बोलताना सचिन अहिर यांनी सांगितले की, “रासू गवई, वसंत डावखरे, माणिकराव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी निर्माण केलेली परंपरा आणि त्या पदाची गरिमा कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल.”

तसेच त्यांनी पुढे स्पष्ट केले, “ज्या भागात पक्षाची संघटनात्मक ताकद कमी आहे, त्या ठिकाणी विशेष लक्ष देणार आहे. ग्रामीण भागात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार आहे.”

ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का

अलीकडेच ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता सचिन अहिर यांनीही पक्षांतर केल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ऑपरेशन टायगर 3.0 ची मोठी शिकार! ‘सचिन अहिर यांनी आज षटकार मारला’; शिवसेना प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Web Title: Sachin ahir slams thackeray group after joining eknath shinde shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Sachin Ahir
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.