Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger : ‘सहा खासदार शिंदे गटात येणार’; संजय गायकवाडांचा दावा, ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल

Sanjay Gaikwad On Sanjay Raut: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटातील सहा खासदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे खासदार घरवापसी करतील, असे म्हटले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 17, 2026 | 06:41 PM
‘सहा खासदार शिंदे गटात येणार’; संजय गायकवाडांचा दावा, ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल

‘सहा खासदार शिंदे गटात येणार’; संजय गायकवाडांचा दावा, ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • ‘सहा खासदार शिंदे गटात येणार’
  • संजय गायकवाडांचा दावा
  • ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
Sanjay Gaikwad On Sanjay Raut News In Marathi : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना (उबाठा) गटातील काही खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले. याचदरम्यान आता बुलढाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. ठाकरे गटातील सहा खासदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा संजय गायकवाड यांनी केला आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Sanjay Nirupam News: २०२९ पर्यंत शिवसेना ठाकरे गट संपणार;संजय निरुपम यांचा दावा अन् उद्धव ठाकरेंचा पलटवार

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोकप्रतिनिधी शिंदे सेनेत येण्यास इच्छुक आहेत. राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्यात असल्यामुळे ठाकरे गटातील खासदार घरवापसीचा निर्णय घेत असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची योग्य दखल घेतली जात नसल्याने अनेकजण नाराज असल्याचे सांगत, पक्ष सांभाळण्याची क्षमता ठाकरे गटाच्या नेतृत्वात उरलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक असते, मात्र ते होत नसल्याने पक्षातून गळती सुरू असल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना गायकवाड म्हणाले की, पक्षातील लोकांना आपुलकीची वागणूक मिळत नसल्याने अनेक नेते आणि पदाधिकारी पक्ष सोडत आहेत. “ज्यांना जायचे त्यांनी जावे” असे वक्तव्य करून त्यांनी ठाकरे गटातील आगामी राजकीय घडामोडींचे संकेत दिले.

खासदारांच्या संभाव्य पक्षांतराबाबत बोलताना त्यांनी पक्षांतरबंदी कायद्याविषयी सुरू असलेल्या चर्चांवरही भाष्य केले. राजकीय सुरक्षितता आणि भविष्यातील राजकीय वाटचाल लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी निर्णय घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळात काही आमदारही शिंदे सेनेचा मार्ग स्वीकारू शकतात, असा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितले की, शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत. राज्याला सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता त्यांच्यात असून भविष्यातही तेच नेतृत्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना भविष्यात देशाच्या पंतप्रधानपदावर पाहायला आवडेल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना गायकवाड यांनी केवळ अधूनमधून होणाऱ्या कर्जमाफीपेक्षा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची गरज भासू नये, अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी सरकारने धोरणात्मक उपाययोजना कराव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले. संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यांमुळे ठाकरे गटातील संभाव्य राजकीय हालचाली, खासदारांचे भवितव्य आणि आगामी राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

KDMC News : आगरी-कोळी समाज आक्रमक; केडीएमसीचे वादग्रस्त पुस्तक रद्द करण्यासाठी जोरदार मागणी

Web Title: Sanjay gaikwad claims six mps to join shinde shiv sena slams uddhav thackeray group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Sanjay Gaikwad
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

महायुतीत वाढणार संघर्ष? क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा
1

महायुतीत वाढणार संघर्ष? क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा

अभिजीत दिपके यांच्या भेटीवरून महायुतीत खळबळ? बच्चू कडू, संजय शिरसाट यांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी
2

अभिजीत दिपके यांच्या भेटीवरून महायुतीत खळबळ? बच्चू कडू, संजय शिरसाट यांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी

Jawali News: जावळीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी! अंकुश कदम यांची शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती
3

Jawali News: जावळीच्या सुपुत्रावर मोठी जबाबदारी! अंकुश कदम यांची शिवसेना प्रवक्तेपदी नियुक्ती

Annabhau Sathe Memorial: अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’ उभारणार; फडणवीस-शिंदे यांची मोठी घोषणा
4

Annabhau Sathe Memorial: अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’ उभारणार; फडणवीस-शिंदे यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.