संजय राऊतांची मोडींवर टीका (फोटो- ShivSena UBT )
संजय राऊतांची शिंदेंवर सडकून टीका
दसरा मेळाव्यात राऊतांची तोफ धडाडली
केंद्र सरकारवर देखील केला हल्लाबोल
Maharashtra Politics: आज मुंबईच्या शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी ठाकरे यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि महायुती सरकार व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील राज्य व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी कशा प्रकारची टीका केली आहे ते जाणून घेऊयात.
दसरा मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आज आपल्याकडे लक्ष आहे. 68 वर्षांपूर्वी शिवसेना शिवसेनाप्रमुखांनी पेटवलेली ठिणगी शिवसेनेची, त्याचा वणवा या मुसळधार पावसात देखील विझू शकत नाही. हे शिवतीर्थ आहे. हे फक्त आपल्या शिवसेनेचे आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली, त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही.”
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “आज मुंबईत पाऊस आहे. मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा.