नुडल्स खाण्यामुळे शरीराला होणारे तोटे (फोटो सौजन्य - iStock)
इन्स्टंट नूडल्स हे केवळ सोयीस्करच नाहीत तर स्वादिष्टदेखील आहेत. पटकन तयार होणारा हा पदार्थ आहे आणि म्हणून अनेकदा आठवड्यातून १-२ वेळा हा पदार्थ घरीही केला जातो. इन्स्टंट नुडल्स विशेषतः मुलांमध्ये आवडते. ते काही मिनिटांत तयार होतात, त्यामुळे प्रौढांनाही ते आवडतात. तथापि, इन्स्टंट नूडल्स गंभीर आरोग्य धोके निर्माण करतात.
बहुतेक लोकांना फक्त एवढेच माहीत असते की इन्स्टंट नूडल्स पोटासाठी हानिकारक आहेत कारण ते रिफाइंड पिठापासून बनवले जातात. शिवाय, ते वजन वाढण्यास हातभार लावतात. मात्र याचे इतरही अनेक तोटे आहेत.
काय सांगतात तज्ज्ञ
नवी दिल्लीतील ईशान्य जिल्हा, जनरल फिजिशियन आणि लसीकरण अधिकारी डॉ. पियुष मिश्रा यांच्या मते, इन्स्टंट नूडल्सचे इतर अनेक तोटे आहेत. खरं तर, इन्स्टंट नूडल्स आधीच शिजवलेले असतात आणि सामान्यतः फ्लेवरिंग पावडर किंवा मसाला तेलांसह येतात. त्यांच्यात सोडियमचे प्रमाण जास्त, संतृप्त चरबी आणि कमी पौष्टिक मूल्य त्यांना अत्यंत आरोग्यदायी मानते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आठवड्यातून दोन किंवा तीन वेळाही इन्स्टंट नूडल्स खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. जास्त इन्स्टंट नूडल्स खाल्ल्याने आरोग्याला काय नुकसान होते ते आपण या लेखातून जाणून घेऊया
हृदयरोगाचा धोका
हृदयरोग वाढण्याचे कारण
आपण अनेकदा जर इन्स्टंट नुडल्स खात असाल तर तुमच्या हृदयासाठी हे अत्यंत नुकसानदायी आहे. यामध्ये सोडियम, सॅच्युरेटेड फॅट्स आणि लो न्यूट्रिशन कंटेटमुळे हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. यामुळे इन्फ्लेमेशन वाढते आणि म्हणून हार्ट अटॅकचा धोका वाढतो आणि याशिवाय स्ट्रोकही येऊ शकतो.
हाय ब्लड शुगर
इन्स्टंट नुडल्समध्ये रिफाऊंड कार्ब्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे साखरेची पातळी त्वरीत वाढते आणि रक्तातील साखरही वाढते. उच्च सोडियम, अनहेल्दी फॅट्स आणि कमी पोषक तत्व असल्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढतो आणि जास्त इन्स्टंट नुडल्स खाल्ल्याने डायबिटीस होण्याची शक्यताही वाढते.
मैद्याचे नूडल्स खाणे सोडा, लहान मुलांसाठी घरीच तयार करा पौष्टिक बटाट्याचे नूडल्स
इम्युनिटी होणार कमकुवत
इम्युनिटी होते कमी
या पद्धतीच्या खाण्यामध्ये विटामिन, प्रोटीन, मिनरल अथवा फायबर नसतं, त्यामुळे अशा पद्धतीच्या खाण्यातून योग्य पोषणही शरीराला मिळत नाही. तसंच या खाण्याने क्रेविंगही वाढते आणि सतत खाण्याने इम्युनिटी कमकुवत झाली. त्यामुळे तुम्हाला आजार पटकन होऊ शकतात.
पचन बिघडू शकतो
इन्स्टंट नुडल्स मैद्याने तयार होतात आणि मैदा आरोग्यासाठी अत्यंत खराब असतो. यामध्ये प्रिझर्वेटिव्ह्ज आणि अन्य Additive असते जे अत्यंत हानिकारक आहे. याच्याशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता असते, जसे की, ब्लोटिंग, गॅस आणि अपचन इत्यादी. जास्त इन्स्टंट नुडल्स खाण्याने बॉवेल मुव्हमेंटची समस्यादेखील वाढीला लागते.
वंधत्वाची समस्या
वंध्यत्वाच्या समस्येत वाढ
अधिक प्रमाणात इन्स्टंट नुडल्स खाल्ल्याने महिलांवर अधिक परिणाम होतोच. महिलांच्या फर्टिलिटीवर याचा परिणाम होतो आणि कन्सिव्ह करण्यासाठी त्रास होऊ शकतो. तसंच यामुळे महिलांमधील हार्मोनल संतुलन बिघडून प्रभावित होऊ शकते. गर्भवती महिलांनी इन्स्टंट नुडल्स खाण्यापासून स्वतःला दूर ठेवावे. यामुळे होणाऱ्या बाळाच्या वाढी विकास खुंटतो.
10 तासांपेक्षा झोपणे ठरू शकते गंभीर, वंध्यत्व-डायबिटीससह 5 आजारांचा वाढतो धोका
वजन वाढ
वजनवाढीलाही कारणीभूत
इन्स्टंट नुडल्स शरीरातील अनावश्यक फॅट्स वाढवतात आणि त्यामुळे लठ्ठपणाची समस्याही वाढीस लागते. यामध्ये असणारे अनहेल्दी फॅट्स आणि ट्रान्स फॅट्स शरीरातील चरबी वाढविण्याचे काम करते. तुम्हाला भूक लागली असेल आणि इन्स्टंट नुडल्स खाल्ले तर पोट भरल्यासारखे वाटते पण शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत आणि पुन्हा लवकर भूक लागू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.