
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का? महापौरपदाबाबत एकनाथ शिंदेंनी टाकला डाव
उल्हासनगरमध्ये अपक्ष उमेदवावर शिंदेंच्या पक्षात
संख्याबळाच्या शर्यतीत शिवसेना पुढे
महापौरपदासाठी भाजपचे टेंशन वाढले
उल्हासनगर: राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. 29 महापालिकेत 25 ठिकाणी महायुतीची सत्ता आली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडसह उल्हासनगरमध्ये देखील महायुतीची सत्ता आलेली आहे. त्यातच आता उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता वाढली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी राजकीय खेळी खेळल्याचे म्हटले जात आहे.
भाजप शिवसेनेने अनेक महानगरपालिका निवडणुका एकत्रित लढल्या होत्या. त्यामध्ये उल्हासनगरचा देखील समावेश आहे. मात्र श्रीकांत शिंदे यांनी राजकीय डाव खेळला असल्याने भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आता या महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर होणार असे चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेत एकूण 78 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यामध्ये भाजपला एकूण 37 जागा मिळाल्या. मात्र शिवसेनेने मास्टर स्ट्रोक खेळत आपली नगरसेवकांची संख्या 38 वर नेली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेत निवडून आलेल्या अपक्ष उमेदवाराने शिवसेनेत प्रवेश केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 38 वर गेल्याचे दिसते आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक देखील शिवसेनेसोबत जाणार असल्याचे समोर येत आहे.
Maharashtra Politics: “…नाराजी खपवून घेतली जाणार नाही”; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा
फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करतानाच त्यांना पारदर्शक कारभाराचा कडक डोस दिला आहे. “महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा किंवा व्यवसाय नाही, तर ते सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे माध्यम आहे,” अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवकांना सुनावले.
पुणे महापालिकेच्या गेल्या ३०-३५ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला इतके प्रचंड बहुमत मिळाले नव्हते. या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “मीडियामध्ये चुरशीची लढत दाखवली जात होती, पण आपल्या कार्यकर्त्यांनी ही लढत एकतर्फी केली. पुणेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवून ही मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकली आहे.”
Devendra Fadnavis: “मुंबईचा महापौर कोण?” देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
महापालिकेतील महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर पदांच्या वाटपावरून पक्षात कोणतीही गटबाजी किंवा नाराजी खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “कुणाला यावर्षी संधी मिळेल तर कुणाला पुढच्या वर्षी, मात्र पुणेकरांनी दिलेला विश्वास महत्त्वाचा आहे. जर आपण पदांच्या वादात अडकलो तर जनता आपल्याला माफ करणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.