चित्रा वाघ यांचे जरांगे पाटलांना प्रत्युत्तर (फोटो- ani )
Chitra Wagh: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी एका भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आईबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यानंतर भाजप नेत्यांनी जरांगे पाटलांवर टीका केली. त्यात चित्रा वाघ यांचा समावेश देखील होता. त्यानंतर जरांगे पाटील यांनी तुझ गबाळ उचकिन असा इशारा वाघ यांना दिला होता. त्याला आता भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
जरांगे पाटील नेमके काय म्हणाले होते?
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही. मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा बोललो. परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. पण मग देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावे, असंही जरांगे म्हणाले.
सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही…
'डीजे'वर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने.
कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर.
…आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवरव्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा… pic.twitter.com/gu7FRkobND
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 24, 2025
मनोज जरांगे पाटील यांच्या रविवारच्या पत्रकार परिषदेनंतर चित्रा वाघ, प्रसाद लाड यांच्यासह भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते. याबाबत मनोज जरांगे यांना विचारले असता त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली. तू माझ्या नादी लागू नकोस. माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर ज्या पद्धतीने भाष्य करण्यात आले ते महाराष्ट्राला पटणारे नाही. आम्हाला तुमचा देखील आदर आहे. जरांगे पाटील हे समाजाच्या आरक्षणासाठी काम करत आहात. हे आरक्षण जर कोण देणार तर, ते देवेंद्र फडणवीसच देणार. मात्र आशा पद्धतीने त्यांच्या आईवर टीका केली गेली नाही,हे कोणीही खपवून घेणार नाही. त्यांनी त्यांचे शब्द मागे घेतले, त्याबाबत त्यांचे स्वागत आहे.
जरांगे पाटील यांनी माझ्यावर टीका केली. गबाळ उचकीन असे म्हणाले. मात्र मी त्यांना घाबरणारी नाही. माझ नाव चित्रा वाघ आहे. मी गेली 27 वर्षे राजकारणात, समाजकारणात काम करत आहे. माझ काय गबाळ उचकायच ते उचका. मी त्यांना घाबरणारी नाही. मी माझे काम करतच राहणार.