Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटाचे खासदार फुटणार? ‘ऑपरेशन टायगर’ बद्दल उदय सामंतांचे मोठे वक्तव्य

'ऑपरेशन टायगर' च्या अंतर्गत ठाकरे गटातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 15, 2026 | 08:13 PM
'ऑपरेशन टायगर' बद्दल उदय सामंतांचे मोठे वक्तव्य

'ऑपरेशन टायगर' बद्दल उदय सामंतांचे मोठे वक्तव्य

Follow Us
Follow Us:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याचा दावा केला जात असून, याच ‘ऑपरेशन टायगर‘ च्या अंतर्गत ठाकरे गटातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले उदय सामंत ?

उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित खासदारफुटीच्या चर्चांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या कोणत्याही खासदारासोबत संपर्क नसल्याचे सांगत अशी कोणतीही मिटिंग झाली नसल्याचे स्पष्ट केले. आम्हाला ऑपरेशन टायगरची गरज नाही, असे म्हणत त्यांनी ऑपरेशन टायगरबाबत मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी संजय राऊतांवरदेखील भाष्य करत ‘संजय राऊतांनी उबाठाचं अस्तित्व टिकवलं आहे,’ असे म्हंटले आहे. उदय सामंतांच्या विधानामुळे ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात नसल्याचे समाजत असले तरीही, येणाऱ्या काळात राजकीय घडामोडी अधिक स्पष्ट होतील.

ऑपरेशन टायगरची ठाकरेंना धास्ती? खासदार फुटीबाबत संजय राऊतांचे मोठे विधान

खासदारांपाठोपाठ आता ठाकरेंच्या आमदारांचीही होणार बैठक

कथित खासदारफुटीच्या चर्चांवरून शिवसेना ठाकरे गटाकडून खासदारांची बैठक पार पडली होती. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. सोमवारी 22 जून रोजी दुपारी चार वाजता हि मिटिंग ठेवण्यात आली असून मंत्रालयासमोरील ‘शिवालय‘ येथे हि बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्व सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

कथित खासदारफुटीवरून संजय राऊतांचे मोठे विधान

कथित खासदारफुटीवरून संजय राऊत म्हणाले की, “शिवसेनेचा एकच गट असून तो खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. खासदार फुटू शकतात, अशा चर्चा आम्ही गेल्या दोन वर्षांपासून ऐकत आहोत. काल सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते. आज सकाळीदेखील आमचे खासदारांशी बोलणे झाले आहे.”

लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सादर करण्याच्या चर्चांबाबत विचारले असता राऊत म्हणाले, “आज उद्धव ठाकरे आणि संजय देशमुख यांच्यात काही कामानिमित्त चर्चा झाली. आणखी दोन खासदारांशीही ठाकरे यांनी संवाद साधला आहे. तरीही काही खासदार अध्यक्षांना पत्र द्यायला गेले असतील असे वाटत असेल, तर त्या पत्राचा मसुदा समोर आल्यावरच त्याबाबत बोलू.”

Sanjay Nirupam : ‘अहंकारामुळेच उबाठा बुडेल’; उद्धव ठाकरेंवर संजय निरुपमांचा घणाघात

Web Title: Uday samant reacts on rumours of shivsena uddhav thackeray camp mp split operation tiger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uday Samant
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Manoj Jarange: बीडमध्ये सरकारचे नेते, तर पॅरिसमधून चर्चा! जरांगेंच्या उपोषणाला 20 व्या दिवशी अर्धविराम; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
1

Manoj Jarange: बीडमध्ये सरकारचे नेते, तर पॅरिसमधून चर्चा! जरांगेंच्या उपोषणाला 20 व्या दिवशी अर्धविराम; पडद्यामागे नेमकं काय घडलं?

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’
2

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
3

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!
4

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.