Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : शिंदेंची नाराजी की फडणवीसांची खेळी; गणेश नाईकांना प्रभारी पदावरून हटवण्याचं नेमकं कारण काय ?

मंत्री नाईक यांच्याकडील ही जबाबदारी काढून आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे ठाणे महानगरपालिकेचा निवडणूक प्रभारी म्हणून देण्यात आली आहे. याचं नेमकं कारण काय ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 27, 2025 | 02:45 PM
Maharashtra Politics : शिंदेंची नाराजी की फडणवीसांची खेळी; गणेश नाईकांना  प्रभारी पदावरून हटवण्याचं नेमकं कारण काय ?
Follow Us
Close
Follow Us:
  • शिंदेंची नाराजी की फडणवीसांची खेळी;
  • गणेश नाईकांना प्रभारी पदावरून हटवण्याचं नेमकं कारण काय ?
  • ठाण नवी मुंबईतील राजकारणात चर्चांना उधाण
नवी मुंबई/ सिद्धेश प्रधान : ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे ठाणे जिल्हा निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिली होती. मंत्री नाईक यांच्याकडील ही जबाबदारी काढून आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे ठाणे महानगरपालिकेचा निवडणूक प्रभारी म्हणून देण्यात आली आहे. या निर्णयाचे कोणतेही स्पष्टीकरण भाजपाने दिले नसल्याने या निर्णयाने अनेक शंका कुशंकाना वाव मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामागे कोणती राजकीय खेळी आहे असे प्रश्न विचारले जात आहेत.

मुंबईसोबत ठाण्यावर देखील भाजपाचा डोळा आहे. किंबहुना इतिहासात डोकावले असता ठाण्यात भाजपचीच सत्ता होती. मात्र आनंद दिघे यांनी या सत्तेला सुरुंग लावत ती शिवसेनेकडे खेचून आणली. त्यानंतर आजतागायत शिवसेनेने ठाणे कधीही सोडलेले नाही. भाजपाच्या मनात ठाण्यासारखा एकेकेळी संघाचा असलेला बालेकिल्ला गेल्याचे शल्य कायम आहे. त्यामुळे भाजपकडून मुंबईसोबत ठाण्यात देखील आक्रमकपणे निवडणुका लढवून सेनेला शहामी देण्याचा प्रयत्न केला जातो. दिघेनंतर एकनाथ शिंदेंनी ठाण्याची जबाबदारी घेत ठाणे आपल्या हातात ठेवले आहे.

गणेश नाईक पालकमंत्री असताना देखील त्यांना त्यानंतर सत्तापालट करता आली नाही. भाजपात फडणवीसांचा कार्यकाळ सुरू होताच, त्यांनी ठाण्यातील समीकरणे ओळखून पावले उचलण्यास सुरुवात केली. शिंदेंना शह देणारा नेता कोण ? तर साहजिकच गणेश नाईक यांच्याकडे बोट दाखवावे लागते. शिंदे हे नाईक यांना राजकारणात ज्युनिअर असले तरी, बंड केल्यावर मात्र शिंदेंनी आपली दखल संपूर्ण राज्याला घ्यायला भाग पाडली. त्यात मुखमंत्री पद मिळाल्यावर त्यांनी राज्यात पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत ” तळागाळात मिसळणारा” मुख्यमंत्री असा शिक्का त्यांच्यावर बसला. त्यांनी राबविलेल्या लाडक्या बहिणींनी नेत्यांना अजरामर तर बनवलेच मात्र, लोकसभेचा पराभव दामदुपटीने विधानसभेला वसूल करण्यात “लाडकी बहिणच” कामी
आल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे ठाण्यापुरते अल्पावधीत राज्याचे नेते बनले.

सत्ता गेली तरीही तासगाव नगरपालिकेत लागला आर. आर. आबांचा फोटो

यातूनच फडणवीसांनी शिंदेंना कोंडीत पकडण्यासाठी नाईक यांना भाजपाचे संपर्कमंत्री केले. एकप्रकारे नाईक यांना शिंदेंना शिंगावर घेण्याची खुली छूट देण्यात आली. नाईक यांनी देखील तंतोतंत हा मूक आदेश मानून, शिंदेंवर आगपाखड करण्यास सुरुवात केली. त्यात शिंदेंनी मंत्रिपदाच्या काळात घेतलेले निर्णय, नवी मुंबईतील अनेक निर्णयांवर नाईक यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. त्या प्रश्नांना अग्रभागी ठेवत नाईक यांनी शिंदेंवर टीका सुरू केली. त्यातूनच नवी मुंबईसोबत ठाण्यात देखील आम्ही स्वबळावर महापौर बसवू अशा वल्गना नाईक यांनी सुरुवात केली. ही टीकेची पातळी थेट शिंदेंना रावणाची उपमा देण्यापर्यंत घसरली होती. मात्र शिंदेंकडून मात्र संयमाचे राजकारण केले गेले. त्यांच्या संयमातून “मला संपूर्ण महाराष्ट्र पहायचाय” असाच मूक संदेश ते नाईकांच्या टीकेला दुर्लक्षित करत राहिले.

शिंदेंचे स्थानिक पदाधिकारी गणेश नाईकांच्या टीकेला उत्तर देत होते. निवडणुकीच्या तोंडावर देखील वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे भाजपने ठाणे जिल्हा निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिली होती. ती जबाबदारी पेलत अंबरनाथ बदलापूरच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत नाईक यांनी शिंदेंवर टीकेची संधी सोडली नाही. मात्र जसजशा नवी मुंबईत युतीच्या चर्चा सुरू झाल्या नि गणेश नाईक यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याचे निवडणूक प्रभारिपद काढून घेण्यात आले. हे पद काढताना पक्षाने कोणतेही ठोस कारण दिले नसल्याने त्याभोवती शंका कुशंकांचे वातावरण पसरले आहे. ठाण्यात भाजपा सेनेची युती होत असल्याने तिथे गणेश नाईकाकडून जबाबदारी काढण्यात आली आहे का? गणेश नाईकांनी संपूर्ण ताकद नवी मुंबईत लावावी हा त्यामागचा उद्देश पक्ष नेतृत्वाचा आहे का? तसे असल्यास भाजपा युती करणार नाही हे भाजपने आधीच ठरवले आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आम आदमी पक्षाला कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीची साथ; निवडणुकीचे चित्र बदलणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: भाजपाने गणेश नाईक यांच्याकडून कोणती जबाबदारी काढून घेतली आहे?

    Ans: भाजपाने वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडील ठाणे जिल्हा निवडणूक प्रभारी ही जबाबदारी काढून घेतली आहे.

  • Que: ही जबाबदारी आता कोणाकडे देण्यात आली आहे?

    Ans: ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

  • Que: भाजपाने हा निर्णय का घेतला, याबाबत अधिकृत कारण दिले आहे का?

    Ans: नाही. भाजपाकडून या निर्णयामागचे कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही, त्यामुळे अनेक शंका उपस्थित होत आहेत.

Web Title: What is the real reason for removing ganesh naik from the in charge position

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Ganesh Naik
  • shivsena

संबंधित बातम्या

Sanjay Raut PC: भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचाय, त्यादृष्टीने…. ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
1

Sanjay Raut PC: भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचाय, त्यादृष्टीने…. ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

राजकीय हालचालींना वेग, भाजपच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता; दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका सुरू
2

राजकीय हालचालींना वेग, भाजपच्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता; दोन्ही राष्ट्रवादीच्या बैठका सुरू

इचलकरंजीत महायुतीला बंडाळीचे ग्रहण; भाजपमधील निष्ठावंताची वेगळी चूल
3

इचलकरंजीत महायुतीला बंडाळीचे ग्रहण; भाजपमधील निष्ठावंताची वेगळी चूल

Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती
4

Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.