सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातून एकाला केली अटक
मुंबई : राज्यामध्ये सध्या अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हत्येमुळे वातावरण तापले आहे. बॉलीवुडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात जीवघेणा हल्ला करण्यात आला. रात्री 2 वाजता अज्ञात व्यक्तीने घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच यामध्ये सैफी अली खानवर धारदार शस्त्राने सहा वार करण्यात आले. लिलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर उपचार व शस्त्रक्रिया सुरु आहे. यावरुन मात्र राज्यातील राजकारण्यामध्ये जोरदार वादंग निर्माण झाला आहे.
यापूर्वी काही महिन्यांपूर्वी बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यात आला. गोळीबारमध्ये बाबा सिद्दीकी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमागे लॉरेन्स बिश्नोई याचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यामधील चांगल्या सबंधांमुळे हा हल्ला झाला असल्याचा आरोप करण्यात आला. त्याचबरोबर यापूर्वी सलमान खानच्या घरावर देखील गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर आता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामागे धार्मिक कट्टरवादी लोक असल्याचा दावा देखील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्याचबरोबर शऱद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत आणि नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन विरोधकांनी प्रश्न निर्माण केला आहे. यानंतर आता सत्ताधारी नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
विरोधकांनी अभिनेत्यांवर वाढत्या हल्ल्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधकांच्या टीकेवर राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. योगेश कदम यांनी विरोधकांना सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर राजकारण करु नये असे देखील सुचवले आहे. तसेच जातीवरुन टीका करणाऱ्यांना देखील खडेबोल सुनावले आहेत.
काय म्हणाले योगेश कदम?
योगेश कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावरुन राजकारण्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. योगेश कदम म्हणाले की, “सैफ अली खानवर झालेला हल्ला चौरीच्या उद्देशाने झाला असावा, असे प्राथमिक तपासात उघड होत आहे. सध्या पोलिसांना याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सापडले असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत. चोराचा चेहरा देखील स्पष्ट झाला असून आम्ही माहिती गोळा करत आहोत. तपास सुरू असून चोरीचा प्रयत्न होता की हत्येचा? हे आत्ताच सांगू शकत नाही. तर तो व्यक्त मागच्या भिंतीवरून घरात घुसल्याचेही’ कदम यांनी म्हटले आहे.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता सैफ अली खान यांच्यावर धार्मिक कट्टरवादीयांकडून पूर्वनियोजित हल्ला झाल्याचा आरोप केला होता. यावरुन राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी खडेबोल सुनावले आहे. योगेश कदम म्हणाले की, “आता विरोधक सैफ अली खानवरील हल्ल्यामुळे सरकारवर हल्ला करत आहेत. ते याचा राजकीय मुद्दा बनवू इच्छितात. पण फक्त त्याचे आडनाव खान असल्याने हे केलं जातयं” असा दावा योगेश कदम यांनी केला आहे.