'मला हलक्यात घेऊ नका' शिंदें समोरच अजित पवारांची साहित्य संमेलनात फटकेबाजी
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होऊन पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडले होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप न झाल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले होते. त्यानंतर आता राज्याचे लवकरच अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे.
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. कृषक कृषी प्रदर्शनात अजित पवार यांनी उपस्थिती लागली आहे. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थसंकल्प लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे येत्या 03 मार्चपासून सुरु होणार आहे. तर राज्याचा नवीन अर्थसंकल्प हा येत्या 10 मार्च रोजी सादर होणार आहे. त्यामुळे आगामी अर्थिक वर्षामध्ये महायुती सरकार कोणत्या नवीन योजना आणणार आणि खर्च काढणार याचा लेखाजोखा मांडणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महायुतीच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवेळी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती. 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी ही जाहीर केली होती. त्यानंतर अल्पवधीमध्ये लोकप्रिय झालेल्या या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा झाला. महायुती सरकारने त्यावेळी दर महिन्याला दीड महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दर महिन्याला 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महायुतीचे पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये नवीन योजनेचा हप्ता जाहीर केला जाईल अशी माहिती महायुतीच्या नेत्यांनी दिली होती.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामधील महायुती सरकार स्थापन झाले आहे. महायुती सरकार पुन्हा एकदा स्थापन झाल्यानंतर पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. याची तारीख ही अर्थमंत्री अजित पवार यांनीच जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या 3 मार्चपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडकी बहीणींना मोठी खुशखबर मिळणार आहे. अजित पवार हे 10 मार्च रोजी जाहीर करणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या योजनेचा लाभ 2100 रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे.
किती लाडक्या बहीणींनी घेतला लाभ?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यामध्ये मोठी लेकप्रियता आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जुलै ते डिसेंबर असे सहा महिन्यांचे पैसे जमा झाले आहे. यातील प्रत्येक महिन्याला 1500 असे मिळून एकत्रित 9 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यभरातील सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजेनचा लाभ घेतला आहे. मात्र आता जानेवारी महिन्याचे 15 दिवस उलटले तरी या महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नहाी. हे पैसे कधी मिळणार याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच राज्याच्या अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर 2100 रुपयांचा हप्ता मिळण्यास सुरुवात होईल अशी आशा देखील लाडक्या बहीणींना आहे.