खूप पूर्वी, पवित्र इक्ष्वाकू वंशात युवनाश्व नावाचा एक धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता.राजाकडे सर्व काही होते, सत्ता, सन्मान, समृद्ध राज्य. हा असा राजा होता ज्याचं त्याच्या प्रजेवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम होतं. राजा प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष होता पण मुलबाळ नसल्यानं दुखी होता. माझ्यानंतर ही सत्ता, हे राज्य कोणाच्या हवाली द्यावी जर वंश पुढे वाढला असता तर सगळं काही मी माझ्या पुढच्या पिढीच्या हाती दिलं असतं या विचाराने राजाला खंत वाटायची. पण राजाने परिस्थितीसमोर हार मानली नाही. वंश आणि धर्म टिकावा म्हणून राजा युवनाश्वाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञाच्या समाप्तीनंतर ऋषींनी
मंत्रांनी सिद्ध केलेले पवित्र जल पहाटे राणीने प्राशन करावे म्हणून ठेवले. पण राजाचं, राणीचं आणि संपूर्ण इक्ष्वाकू वंशाच्या नशिबात काही वेगळंच होतं. पुत्रप्राप्तीसाठी दिलेलं हे जल राणीपर्यंत पोहोचलंच नाही.
त्या रात्री राजा युवनाश्वला तहान लागल्याने तो जागा झाला.राजवाडा शांत होता. सेवक झोपेत होते. समोर पाण्याचे पात्र दिसले.ते यज्ञजल आहे, याची कल्पनाही नसताना राजाने ते पाणी प्राशन केले. काही काळानंतर ऋषींनी जगाने कधीही न ऐकलेली घोषणा केली. राणी नव्हे. स्वतः राजा युवनाश्व गर्भवती असल्याचं संपूर्ण राज्याला कळलं. कारण मंत्र, तप आणि नियती हे लिंग, देह किंवा सीमांना मानत नाहीत, असं ऋषिंचं म्हणणं होतं. प्रसवाचा काळ आला.
पण जन्मासाठी कोणताही मार्ग नव्हता.तेव्हा ऋषींनी दिव्य ज्ञानाच्या साहाय्याने राजाच्या डाव्या मांडीला चीर दिली.त्यातून एक तेजस्वी बालक जन्माला आलं.
या बालकाचा जन्म झाल्यानंतर इंद्रदेव स्वतः पृथ्वीवर अवतरले. त्यांनी त्या बालकाला बालकाला उचलले आणि म्हणाले “माम् धास्यति म्हणजेच मी या बाळाचं पालन पोषण करेन. इंद्रदेवांच्या या वाक्याने त्या बालकाचे नाव पडले मंधाता. मंधाता मोठा झाल्यानंतर तो फक्त इक्ष्वाकू घराणाच्या राजपुत्रच नाही तर चक्रवर्ती सम्राट झाला. ज्याच्या धर्माच्या चाकांनी संपूर्ण पृथ्वी व्यापली. आणि याचे राजाने प्रभू रामांच्या वंशाचा आरंभ केला. ज्या राजाला असं वाटत होतं की त्याचा वंश आणि धर्मं संपुष्टात येईल तो राजा सूर्यवंश घराण्यांची सुरुवात होता. निर्मिती कधी विचारत नाही की तुम्ही कोण आहात.
ती फक्त विचारते तुम्ही स्वीकारण्यासाठी तयार आहात का? राजाने गर्भात वाढणारा जीव स्विकारला आणि पुढे सूर्यवंश घराण्याचा उद्धार होत गेला.
Ans: ही कथा इक्ष्वाकू वंशातील राजा युवनाश्व यांच्याशी संबंधित आहे.
Ans: पुत्रप्राप्तीसाठी करण्यात आलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञातील मंत्रसिद्ध जल चुकून राजा युवनाश्व यांनी प्राशन केले. त्या मंत्रांच्या प्रभावामुळे राजा स्वतः गर्भवती झाला, असे पुराणकथांमध्ये सांगितले जाते.
Ans: मंधाता याच वंशातून पुढे सूर्यवंशाची परंपरा वाढत गेली आणि त्याच सूर्यवंशात पुढे प्रभू रामांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे.






