फोटो सौजन्य- istock
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत करण्याची परंपरा आहे. पंचांगानुसार, प्रदोष व्रत 29 सप्टेंबर रोजी आश्विन महिन्यात साजरा केला जाईल. या दिवशी सायंकाळी महादेवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, हे व्रत केल्याने व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. तसेच शुभ परिणाम प्राप्त होतात. अशा स्थितीत प्रदोष व्रताच्या दिवशी शिव द्वादशज्योतिर्लिंग स्तोत्राचे पठण करावे. असे मानले जाते की त्याचे पठण केल्याने व्यक्तीला इच्छित करिअर प्राप्त होते आणि सर्व कामांमध्ये यश मिळते. शिव द्वादशज्योतिर्लिंग स्तोत्र जाणून घेऊया.
प्रदोष व्रत शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 29 सप्टेंबर रोजी दुपारी 4.47 पासून सुरू होईल. त्याचवेळी, ही तारीख 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7:06 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत 29 सप्टेंबर रोजी प्रदोष व्रत पाळण्यात येणार आहे. हा दिवस रविवार असल्याने याला रवी प्रदोष व्रत म्हटले जाईल.
हेदेखील वाचा- chanakya niti: निरोगी राहण्यासाठी रोज करा या गोष्टींचे सेवन
॥ शिव द्वादशज्योतिर्लिङ्ग स्तोत्र ॥
सौराष्ट्रदेशे विशदेऽतिरम्येज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसम्।
भक्तिप्रदानाय कृपावतीर्णतं सोमनाथं शरणं प्रपद्ये॥
श्रीशैलशृङ्गे विबुधातिसङ्गेतुलाद्रितुङ्गेऽपि मुदा वसन्तम्।
तमर्जुनं मल्लिकपूर्वमेकंनमामि संसारसमुद्रसेतुम्॥
अवन्तिकायां विहितावतारंमुक्तिप्रदानाय च सज्जनानाम्।
अकालमृत्योः परिरक्षणार्थंवन्दे महाकालमहासुरेशम्॥
कावेरिकानर्मदयोः पवित्रेसमागमे सज्जनतारणाय।
सदैव मान्धातृपुरे वसन्तमोङ्कारमीशं शिवमेकमीडे॥
पूर्वोत्तरे प्रज्वलिकानिधानेसदा वसन्तं गिरिजासमेतम्।
सुरासुराराधितपादपद्मंश्रीवैद्यनाथं तमहं नमामि॥
हेदेखील वाचा- चुकीच्या मोबाईल नंबरमुळे बिघडतात वडील – मुलाचे संबंध, वाढतात शत्रू, कसे ते जाणून घ्या
याम्ये सदङ्गे नगरेऽतिरम्येविभूषिताङ्गं विविधैश्च भोगैः।
सद्भक्तिमुक्तिप्रदमीशमेकंश्रीनागनाथं शरणं प्रपद्ये॥
महाद्रिपार्श्वे च तटे रमन्तंसम्पूज्यमानं सततं मुनीन्द्रैः।
सुरासुरैर्यक्षमहोरगाद्यैःकेदारमीशं शिवमेकमीडे॥
सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तंगोदावरीतीरपवित्रदेशे।
यद्दर्शनात्पातकमाशु नाशंप्रयाति तं त्र्यम्बकमीशमीड॥
सुताम्रपर्णीजलराशियोगेनिबध्य सेतुं विशिखैरसंख्यैः।
श्रीरामचन्द्रेण समर्पितं तंरामेश्वराख्यं नियतं नमामि॥
यं डाकिनीशाकिनिकासमाजेनिषेव्यमाणं पिशिताशनैश्च।
सदैव भीमादिपदप्रसिद्धंतं शङ्करं भक्तहितं नमामि॥
सानन्दमानन्दवने वसन्तमानन्दकन्दं हतपापवृन्दम्।
वाराणसीनाथमनाथनाथंश्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये॥
इलापुरे रम्यविशालकेऽस्मिन्समुल्लसन्तं च जगद्वरेण्यम्।
वन्दे महोदारतरस्वभावंयरघृष्णेश्वराख्यं शरणं प्रपद्ये॥
ज्योतिर्मयद्वादशलिङ्गकानांशिवात्मनां प्रोक्तमिदं क्रमेण।
स्तोत्रं पठित्वा मनुजोऽतिभक्त्याफलं तदालोक्य निजं भजेच्च॥
॥ इति श्रीद्वादशज्योतिर्लिङ्गस्तोत्रम् सम्पूर्णम्। ॥
रवी प्रदोष व्रताच्या दिवशी करा हे उपाय
तुमच्या व्यवसायाची प्रगती दुप्पट करण्यासाठी संध्याकाळी पाच वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळी घेऊन शिवमंदिरात जा आणि त्या रंगांनी गोल फुलांच्या आकाराची रांगोळी काढा. आता या रांगोळीच्या मध्यभागी तुपाचा दिवा लावा आणि भगवान शंकराचा आशीर्वाद घ्या.
जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल तर आज सूर्यदेवाची पूजा करावी. तसेच गाईला ज्वारीची भाकरी खायला द्यावी आणि आशीर्वाद घ्यावा. आज हे केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होईल.