फोटो सौजन्य- istock
गुरुवार, 12 जून. आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास राहील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला असेल. व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायामध्ये नवनवीन संधी उपलब्ध होतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असलेल्या लोकांचे कामाचे ठिकाणी कौतुक होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे कठीण काम सहजपणे पूर्ण होईल. तुम्ही कोणतेही मोठे निर्णय घेऊ शकता. धार्मिक कार्यात सहभागी होतील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी दिवस चांगला आहे.
मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. या लोकांचा मानसिक ताण कमी राहील. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. वाद घालू नका.
मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष केंद्रित करुन काम करावे लागेल. तुम्हाला कोणतीही दीर्घकालन गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
मूलांक 5 असलेल्या लोकांना आजचा दिवस व्यस्त राहील. कामाच्या ठिकाणी मोठे बदल सहन करावे लागतील. तुम्हाला अनेक ठिकाणी नवीन संधी मिळू शकतील.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस खास राहील. इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कला, सौंदर्य किंवा सर्जनशीलतेशी संबंधित कामांमध्ये तुमची आवड वाढेल. आज एखाद्या अनोळखी व्यक्तीची भेट होईल त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल.
मूलांक 7 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना एखाद्या निर्णयाचा खोलवर विचार करतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होतील.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा दिवस सामान्य राहील. या लोकांच्या अंगावर आज अनेक जबाबदाऱ्या येतील. तुम्हाला कोणतेही काम करताना हुशारीने करावे लागेल. कामाच्या ठिकाणी शिस्तीने आणि वेळेवर काम केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. आज तुम्ही इतरांना मदत केल्याने त्याचा तुम्हाला फायदा होईल. आज धावपळ करणे टाळा. आज तुम्हाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पण तुम्ही ते धैर्याने सोडवू शकाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)