या महिन्याच्या 7 तारखेला चंद्रग्रहण असणार आहे. भाद्रपद शुद्ध पौर्णिमा म्हणजे येत्या रविवारी हे खग्रास चंद्रग्रहण आहे. भारतासह आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, फिजी आणि अंटार्क्टिका च्या काही भागातही हे चंद्रग्रहण दिसणार आहे. ग्रहण म्हटलं की अनेक तर्क वितर्क काढले जातात. खगोलशास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्रात देखील ग्रहणाला विशेष महत्व आहे. या ग्रहणात काय काळजी घ्यावी याबाबत ज्योतिषतज्ज्ञ विजय महाजन यांनी माहिती सांगितली आहे.
भाद्रपद शुद्ध पौर्णिमा रविवार खग्रास चंद्रग्रहण आहे. ग्रहणाचा स्पर्श रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी आहे संमेलन रात्री 11 वाजता होईल.मध्य रात्री 11:42 आहे व ऊन मिलन रात्री 12 वाजून 23 मिनिटांनी आहे व ग्रहणाचा मोक्ष रात्री 1 वाजून 27 मिनिटांनी आहे तर ग्रहण पर्वकाळ हा 3 तास30 मिनिटाचा आहे.
ग्रहण काळ म्हणजे रात्री 9:57 आणि मोक्षाचा काळ रात्री 1 वाजून 27 मिनिटे पर्यंतचा काळ हा पुण्य काळ मानला जातो .या काळामध्ये मंत्रजप करावा. तसंच आरोग्यासाठी शिव उपासना काली उपासना भैरव उपासना करावी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी उपासना करावी. हे ग्रहण रविवारी रात्रीच्या 11 वाजताच्या सुमारास सुरु होणार आहे. मात्र रविवारी दुपारी 12 वाजून 37 मिनिटांनी वेध सुरू होत आहेत ते वेध ग्रहण मोक्षापर्यंत पाळावयाच्या असतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
वेध काळामध्ये काय काय करावे वेधकाळामध्ये स्नान देवपूजा नित्य कर्म करणे. इष्ट देवतांचा
जप करणे ही कामं करता येतात. वेध काळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नये मात्र वेध काळात पाणी पिणे मलमूत्र उत्सर्ग झोप घेणे ही कर्म करता येतात. खरंतर ग्रहणात वातावरण दुषित झालेले असते याचा परिणाम लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होतो.
लहान बालके आजारी वयोवृद्ध अशक्त गर्भवती यांनी सायंकाळी 5:15 नंतर ग्रहनाचे वेध पाळले तरी चालतात. रात्री 9/57 ते 1/27 या काळात पाणी पिणे झोपणे मलमूत्र ही कामे शक्यतो करू नयेत.ग्रहण स्पर्श होताच आपण स्नान करावे. ग्रहण पर्व काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होऊन दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्र्चरण चंद्रग्रहणात करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहण काळामध्ये पर्व काळामध्ये झोप मलमूत्र भंग स्नान भोजन काम सेवन ही कामे करू नयेत.
या ग्रहणाचा परिणाम काही राशींना चांगला वाईट मिळणार आहे. मेष रास वृषभ रास कन्या रास धनु रास या राशींना या ग्रहणामुळे शुभफल मिळणार आहे. तर हे ग्रहण मिथुन सिंह तुळा मकर या राशींना मिश्र फळ देणार आहे. हे ग्रहण कर्क वृश्चिक कुंभ मीन या राशींना अनिष्ट फल देणारे आहे असं ज्योतिषतज्ज्ञ विजय महाजन यांनी सांगितलं आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)