फोटो सौजन्य- pinterest
शुक्रवार, 23 मे रोजी बुध वृषभ राशीत प्रवेश करेल. वृषभ ही राक्षस गुरु असलेल्या शुक्र ग्रहाची राशी आहे. बुध ग्रह शुक्राच्या राशीमध्ये दुपारी 1 वाजता प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. तो संवाद, स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता, बुद्धिमत्ता, नोकरी आणि व्यवसाय यासाठी देखील जबाबदार ग्रह आहे. जेव्हा बुध ग्रह त्याची जागा बदलतो त्याचा परिणाम सर्व 12 राशीच्या लोकांवर होतो. बुधाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे, जाणून घ्या
बुध वृषभ राशीमध्ये संक्रमण करणार आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. शिवाय कोणत्याही जुन्या वादाचे निराकरण होईल. बुध ग्रहांचे संक्रमण आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. तुम्हाला आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी आहे. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण चांगले राहील. तुम्हाला जीवनात सकारात्मक परिणाम मिळतील. बुध ग्रहांच्या संक्रमणामुळे तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनातील समस्यातून सुटका होईल. जुने मित्र भेटण्याची शक्यता. तसेच करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी विविध संधी उपलब्ध होतील.
कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण शुभ राहणार आहे. यावेळी कन्या राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. बुधाच्या संक्रमणाचा परिणाम म्हणजे तुमची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. घरात नवीन वस्तू घेऊ शकता.
बुधाच्या संक्रमणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांची शिकण्याची क्षमता वाढेल. या राशीच्या लोकांना खूप मेहनत करावी लागेल. जर कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये कामामुळे किंवा सहकाऱ्यांमुळे बराच काळ तणावाचा सामना करावा लागत असेल, तर बुध ग्रहाच्या संक्रमणाच्या प्रभावाने तुम्हाला या सर्व गोष्टींपासून आराम मिळेल आणि तुमच्या शहाणपणाने आणि बोलण्याने सर्वजण प्रभावित होतील.
बुधाचे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी चांगले राहणार आहे. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्याल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगार वाढ होऊ शकते. वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल.
कुंभ राशीच्या लोकांना बुधाच्या संक्रमणामुळे खर्च करताना नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतेही काम पूर्ण करण्याची जिद्द मनात बाळगावी लागेल. अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)