फोटो सौजन्य- pinterest
ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या मंगळवारला मोठा मंगळ किंवा बुधवा मंगळ म्हणून ओळखले जाते. 28 मेपासून ज्येष्ठ अमावस्येची सुरुवात झाली. यावेळी मंगळवार, 3 जून रोजी 5 वा मंगळवार आहे ज्याला चौथा मोठा मंगळ असे म्हणतात.
मंगळवारचा दिवस हनुमानची पूजा करण्यासाठी शुभ मानला जातो. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या मंगळवाराला विशेष महत्त्व असते. या दिवशी हनुमानाचे भक्त त्यांची पूजा करतात. तसेच यावेळी काही उपाय केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात, असे म्हटले जाते.
ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल अष्टमी तिथी मंगळवार, 3 जून रोजी आहे. या दिवशी चौथा मोठा मंगळ देखील आहे. पंचांगानुसार, अष्टमी तिथीची सुरुवात सोमवार, 2 जून रोजी रात्री 8.35 वाजता होईल आणि त्याची समाप्ती मंगळवार 3 जून रोजी रात्री 9.56 वाजता होईल. या दिवशी मोठ्या मंगळची पूजा केली जाणार आहे. तसेच या दिवशी धुमावती जयंती आणि मासिक दुर्गाष्टमी देखील साजरी केली जाणार आहे.
मोठा मंगळच्या दिवशी स्नान करुन स्वच्छ कपडे परिधान करा
देव्हारा स्वच्छ करुन गंगाजल शिंपडून ते स्वच्छ करा
यानंतर चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र पसरवून त्यावर हनुमानाची मूर्ती ठेवा
हनुमानजींना लाल वस्त्र, फुले आणि सुंदर मणी अर्पण करा.
त्यानंतर दिवा लावून आरती करा.
शेवटी सर्वांना प्रसाद म्हणून फळे, बुंदीचे लाडू आणि मिठाई वाटा.
मोठा मंगळच्या दिवशी हनुमानाला सुपारी अर्पण करा. या उपायानमुळे हनुमानजी प्रसन्न होतील. तसेच पान अर्पण केल्याने करिअर आणि व्यवसायाच्या संबंधित समस्या दूर होतात, असे म्हटले जाते.
तसेच मंगळवारी सुंदरकांडचे पाठ करणे शुभ मानले जाते. अशावेळी हनुमानाचे भक्त मोठा मंगळच्या दिवशी उपवास ठेवून सुंदरकांडचे पठण करा
त्याचप्रमाणे गूळ आणि तुपाचे दान करणे देखील शुभ मानले जाते. या गोष्टी दान केल्याने करिअरमध्ये अपेक्षित यश मिळते आणि कामातील अडथळे दूर होतात.
हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मोठा मंगळच्या दिवशी कोणत्याही राम मंदिरात जा आणि रामाच्या नावाचा 108 वेळा जप करा. बजरंगबली देखील यावर खूश होतील.
हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी आजून एक उपाय म्हणजे मोठा मंगळच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे. तसेच जीवनात सुख शांती मिळावी, यासाठी प्रार्थना करावी. हा उपाय केल्याने जीवनातील दुःख आणि त्रास दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)