फोटो सौजन्य- pinterest
सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्याची सुरुवात होताच अनेक ग्रह आपले संक्रमण करणार आहे. याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होणार आहे. सोमवार, 15 सप्टेंबर रोजी बुध ग्रह स्वतःच्या कन्या राशीत संक्रमण करणार आहे. हे संक्रमण विशेष मानले जाते कारण बुध कन्या राशीत म्हणजेच मूलत्रिकोण स्थितीत असणार आहे. या संक्रमणामुळे भद्र योग तयार होईल. त्यापैकी पंच महापुरुष योगांपैकी एक आहे त्याचा परिणाम खूप शुभ राहणार आहे. या संक्रमणाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार असल्याने या काळात तुम्हाला करिअरमध्ये मोठे यश, संपत्तीत वाढ, कौटुंबिक आनंद आणि भाग्य मिळू शकते. बुध ग्रहाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांचा फायदा होईल, जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे संक्रमण चौथ्या घरात होणार आहे. ज्याचा संबंध सुख आणि संपत्तीशी आहे. या संक्रमणामुळे घरातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील आणि पालकांचे सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढू शकतो. रिअल इस्टेट किंवा बांधकाम विभागासारख्या मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो.
कन्या राशीतील बुधाचे स्वतःच्या राशीत होणारे संक्रमण या लोकांसाठी फायदेशीर असू शकते. बुध तुमची बुद्धिमत्ता, संवाद आणि कार्यक्षमता मजबूत करेल. या काळात शिक्षण, स्पर्धा आणि व्यावसायिक जीवनात चांगली कामगिरी करु शकतात. वैयक्तिक जीवन चांगले राहील. संपत्तीच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. याचा परिणाम करिअर आणि व्यवसायावर होईल. जे लोक व्यवसायात आहे त्यांना चांगला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून सहकार्य मिळेल. या काळात तुमची सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल. त्याचबरोबर आर्थिक स्थिती देखील स्थिर राहील.
मकर राशीच्या कुंडलीमध्ये हे संक्रमण नवव्या घरात होत आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले जाईल. आर्थिक दृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. तसेच तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत देखील वाढतील. नोकरीत बदल किंवा बदली हवी असल्यास अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि गोडवा राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)