फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महाराष्ट्रात जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे भोगी. हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’हे वाक्य तुम्ही ऐकलेच असेल. तामिळनाडूत हा सण ‘भोंगीपोंगल’ म्हणून साजरा करतात. तर आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात. तर पंजाबमध्ये ‘लोहिरी’ (Lohri) ,राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या-वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. पण याचा नक्की अर्थ काय, ती का साजरी केली जाते? जाणून घ्या
महाराष्ट्रात भोगी हा उपभोगाचा सण म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. फक्त या सणाला राज्यात विविध नावांनी संबोधले जाते. भोगी या शब्दांचा अर्थ उपभोग घेणारा असा होतो. या दिवशी गावात सडा सारवण घालून दारासमोर रांगोळी काढली जाते. तसेच घरातील सदस्य अभ्यंगस्नान करुन नवीन कपडे परिधान करतात. यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या आंगोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी?
भोगीच्या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पीकं पिकावे म्हणून प्रार्थना करतात, अशी मान्यता आहे. ती पीक वर्षानुवर्षे पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. भोगीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भोगीची भाजी घरा घरामध्ये शिजवली जाते. विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात.
भोगीच्या दिवसात गुलाबी थंडीला सुरुवात होते. भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्वही तितकंच खास आहे. वटाण्याच्या शेंगा म्हणजेच मटार, गाजर, वांगी, घेवडा, वालाच्या शेंगा, हरबरा, तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भोगीची भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. भाकरीसोबत खायला वांग्याचं भरीत केलं जातं. तर काही भागात भाकरी लोण्यासह खातात. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खमंग खिचडीही या दिवशी बऱ्याच ठिकाणी केली जाते.
माघ महिना सुरू होणार आहे, आंघोळीपासून खाण्यापर्यंतच्या दिनचर्येत या गोष्टीचा करा समावेश
जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग असे म्हणतात. भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवायला बोलावले जाते किंवा त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच “भोगी देणे” म्हणतात. भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो. या दिवशी सकाळी आपले घर व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. या दिवशी सकाळी आपले घर व घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात. घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रीत पाण्याने अभ्यंगस्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात. मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. अशाप्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात.