तुम्ही कधी भूतबाधा किंवा करणी याबाबत ऐकलं असेलच पण ज्यांच्यावर करणी झाली अशी माणसांमधील नकारात्मक ऊर्जा इथे बाहेर काढली जाते. सर्वसामान्य माणसांच्या समजण्याच्या पलिकडेच्या गोष्टी या ठिकाणी घडत असतातभूतबाधेन ग्रासलेल्या लोकांनी एकदा गाणगापूरला नक्की भेट द्यावी, अस अनुभवी साधू आणि भक्त सांगतात. इथलं भगवान दत्तात्रेय मंदिर हे भारतातील सर्वांत रहस्यमय तीर्थस्थळांपैकी एक मानल जातं. या आरतीचं देखील एक वैशिष्ट्य आहे. असं म्हटलं जातं की, आरती सुरू होताच भूतबाधित लोक अचानक विचित्र वागू लागतात.किंचाळतात, आरडाओरडा करतात, जमिनीवर लोळतात आणि मंदिरात असलेल्या खांबावरती चढतात. त्यांचे शरीर आणि वाणी त्यांच्या ताब्यात राहत नाहीत. कारण त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा त्यांना मंदाराच्या गाभाऱ्यात जाऊ देत नाही. ही माणसं मंदिराच्या खांबाला उलटे लटकतात आणि महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील भूतबाधित लोक आपल्या घरच्यांना आणि देवतांना अपशब्द बोलू लागतात. या मंदिरात दत्तांच्या आरतीदरम्यान असणारी सकारात्मक ऊर्जा इतकी प्रभावी असते की, बाधित असलेल्या लोकांमधील नकारात्मक ऊर्जा आणि काळ्याच्या जादूचा प्रभाव संपून जातो. आरती संपल्यावर इथे लोकं चानक जमिनीवर पडतात बेशुद्ध होतात.
या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. असं म्हणतात की याठिकाणी गुरुचरित्रातील 20 वा अध्याय वाचल्याने करणी आणि भूतप्रेतापासून मुक्ती मिळते. गाणगापूर देवस्थानाबाबत आणखी एक कथा सांगितली जाते ती अशी की, गाणगापूर गावात पिंपळाच्या झाडावर एक राक्षस राहत होता. एकदा दत्तगुरुंची पालखी या ठिकाणाहून जाताना हा राक्षस मनुष्यरुपात प्रकटला. त्यावेळी हा राक्षस दत्तगुरुंचा शरण आता आणि म्हणाला मला माझे पाप नष्ट करायचे आहेत मी काय करु त्यावेळी दत्तगुरु म्हणाले की, संगमावर जा आणि स्नान कर तुझी सगळी पापं धुवुन निघतील. म्हणूनत आजही प्रत्येक भाविक जेव्हा गाणगापूरला येतात तेव्हा मंदिरपरिसरात असलेल्या नदी संगमावर स्नान करतात, असं म्हटलं जातं की यामुळे करणीबाधा दूर होते. गाणगापूरचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे आजही इथे दत्तगुरु भिक्षा मागायला येतात अशी समज आहे त्याला माधुकरी असं म्हटलं जातं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यापलिकडे काही देखील काही घटना अशा असतात ज्या अनुभवल्याशिवाय विश्वास ठेवता येत नाही. केवळ भूतबाधेसाठीच नाहीच तर दत्तगुरुंचाअध्यात्निक प्रवास जाणून घेण्यासाठी आणि मन:शांतीसाठी का होईना याठिकाणी एकदा तरी भेट द्य़ायला हवी.






