इंग्लंडकडून भारताचा 2 रन्सने पराभव (फोटो- सोशल मिडिया)
लॉर्डसच्या मैदानावर भारत अन् इंग्लंडमध्ये शेवटचा वनडे सामना खेळवला गेला. इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजी केली. इंग्लंडने भारताला 388 रन्सचे भलेमोठे टार्गेट दिले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला होता. शुभमन गिलचे 77, रोहित शर्माचे 138 रन्सची शानदार शतकी खेळी आणि विराट कोहलीच्या 74 रन्सच्या जोरावर भारताने ही टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र 27 रन्सने भारताचा पराभव झाला.
आई शप्पथ! रोहित शर्माने जगाची तोंडं केली बंद, Lord’s वर शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू
दरम्यान भारतीय संघाच्या प्लेइन 11 मध्ये काही बदल करण्यात आले होते. त्यामुळे भारतीय संघाचा पराभव झाला असल्याचे म्हटले जात आहे. काल अनुभव आणि महत्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराहला स्थान देण्यात आले नव्हते. तसेच फलंदाजीच्या क्रमवारीत देखील बदल करण्यात आले होते. त्यामुळे पराभव झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संघात काल काही बदल केल्याचे दिसून आले. बूमराहला शेवटच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. फलंदाजी करताना भारताने पहिल्या विकेटसाथी 147 रन्सची भागीदारी रचली. मात्र त्यानंतर फलंदाजीत असा काही बदल करण्यात आला की त्यामुळे संघ परभवाच्या छायेत जाऊन पोहोचला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
टीम इंडियात मोठी उलथापालथ? सलग पराभवानंतर प्रशिक्षक देणार राजीनामा? BCCI मोठी कारवाई करणार
शुभमन गिल आउट झाल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने शानदार शतकी भागीदारी रचली. रोहित शर्मा आउट झाल्यावर श्रेयस अय्यर खेळण्यासाठी येणे अपेक्षित होते. मात्र त्याच्या ऐवजी डावखुरा फलंदाज इशान किशनला वर खेळण्यासाठी पाठवण्यात आले. इशान किशन देखील चांगली खेळी करू शकला नाही. आणि खालील नंबरवर खेळण्यासाठी आल्याने श्रेयस अय्यर देखील शून्यावर आउट झाला.
तसेच इंग्लंडने दोन स्पिनर्स खेळवले होते. तर भारतीय संघ व्यवस्थापनाने कुलदीप यादवला संधी दिली नव्हती. इंग्लंडने स्पिनर्सच्या जोरावर भारताला विजयापासून रोखले. भारतीय संघात अनुभवी फलंदाज कुलदीप यादवला स्थान दिले गेले असते तर सामन्याचा निकाल काहीसा वेगळा लागू शकला असता अशी चर्चा सुरू झाली आहे.






