फोटो सौजन्य AI फोटो सौजन्य AI
अमेरिकेने सलग ९ व्या रात्री इराणच्या बऱ्याच भागात बॉम्बिंग केलं . त्याला प्रतिउत्तर म्हणून इराणने सुद्धा आखाती देशांवर हल्ले केले . इराणचे विदेश मंत्री अब्बास अरागची यांनी सांगितले की अमेरिके सोबतचे युद्ध हे तेव्हाच थांबेल जेव्हा आम्ही या युद्धात आघाडी घेऊ . इराणच्या सरकारी वृत्त वहिनी आईआरएनए दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की , चर्चा सुद्धा अश्या परिस्थिती झाल्या पाहिजेत जेव्हा इराण ला वाटेल कि युद्ध परिस्थिती इराणच्या बाजूने आहे . पुढे अरागची यांनी असे सांगितले कि कोणत्याही युद्धाचा अंत दोन पद्धतीने होतो एक म्हणजे दोन पैकी एक पक्ष हरतो किंवा दोन्ही देश मिळून वाटाघाटी आणि चर्चा करण्यास तयार होतात . परंतु चर्चा आणि वाटाघाटी तेव्हाच केल्या पाहिजेत जेव्हा आपण चांगल्या स्थितीत असू घाई गडबडी मध्ये चर्चा करण्याला काहीच अर्थ नाही .
याचबरोबर त्यांनी इराणच्या सुरक्षेला सगळ्यात महत्वाचे प्राधान्य असेल हे देखील सांगितले . ते म्हणाले देश आणि त्याची जनता यांचे भविष्य धोक्यात घालून चालणार नाही . घेणारा प्रत्येक निर्णय हा पूर्ण माहिती आणि अभ्यासाच्या नंतरच घेतला गेला पाहिजे . तसेच सरकारला हे सतत पाहिले पाहिजे कि युद्ध सुरु ठेवल्याने देशाला फायदा होतोय का नुकसान . जर नुकसान होत असेल तर निर्णय त्याच नुसार झाला पाहिजे . आता आम्ही काही नुकसान झेलून जगामध्ये पहिल्यापेक्षा जास्त मजबूत झालो आहोत .
पश्चिम आशियात तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने सोमवारी सलग नवव्या रात्री इराणवर हल्ले केले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (सेंटकॉम) नुसार इराणच्या लष्करी कमांड सेंटर, एअर डिफेन्स सिस्टीम, मिसाईल आणि ड्रोन लॉन्च साईट्स सह अनेक लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. वायव्य इराणमधील तब्रिज मिसाईल फील्डमध्ये आग लागल्याची बातमी आहे. ही मिसाईल फील्ड इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) एरोस्पेस फोर्स चालवते.दुसरीकडे, सेंटकॉमने हे देखील सांगितले की उत्तर इराकमध्ये न फुटलेल्या इराणी ड्रोनला नष्ट करताना एका अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाला. आणखी एक अमेरिकन सैनिक जखमी झाला आहे, ज्याच्यावर उपचार सुरू आहेत. यासह युद्धात मारल्या गेलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या आता 17 पर्यंत पोहोचली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही बाजूंनी हल्ले केले जात आहेत. इराणच्या हल्ल्यात 2 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकन सैन्याने आक्रमकता वाढवली आहे.
इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने अमेरिकेवर लोकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा आरोप करत इशारा दिला आहे की, कोणत्याही प्रकारच्या लष्करी कारवाईला किंवा दबावाला त्याचे उत्तर पूर्ण ताकदीने दिले जाईल.इराणच्या सरकारी वृत्तसंस्था IRNA नुसार, इराणच्या सेंट्रल खातम अल-अंबिया मुख्यालयाचे कमांडर मेजर जनरल अली अब्दुल्लाही म्हणाले की, लष्करी पातळीवर अनेक वेळा अपयश आल्यानंतर आता शत्रू लोकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण इराणची अंतर्गत एकता ही या “शैतानी कटाला” हरवण्याची सर्वात मोठी ताकद आहे.अब्दुल्लाही यांनी अमेरिकेला इशारा दिला की जर त्यांनी कोणत्याही प्रकारची आक्रमक कारवाई केली, तर इराणचे सशस्त्र दल त्याला अतिशय कडक उत्तर देतील.IRNA नुसार, अब्दुल्लाही यांनी रविवारी सांगितले की अमेरिकेच्या कोणत्याही लालसेला, दबाव टाकण्याच्या प्रयत्नांना, विस्तारवादी धोरणाला किंवा हिंसक कारवाईला इराणकडून असा निर्णायक आणि नुकसान करणारा प्रतिसाद मिळेल, ज्याची किंमत “दुसऱ्या आणि तिसऱ्या लादलेल्या युद्धांपेक्षाही जास्त भारी” असेल.






