जॉर्डनच्या सैन्याने आयआरजीसीला गुप्त माहिती पुरवली? अमेरिकेच्या २० लक्ष्यांना लक्ष्य केल्याचा इराणचा दावा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पश्चिम आशिया आणि आखाती देशांमधील अमेरिका आणि इराणचा संघर्ष (US-Israel Iran War) आता एका अत्यंत धोकादायक आणि अनपेक्षित वळणावर येऊन पोहोचला आहे. रविवारी (१९ जुलै २०२६) इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) जॉर्डनच्या भूमीवर असलेल्या अमेरिकेच्या किमान २० लष्करी तळांवर एकापाठोपाठ एक भीषण ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या धक्कादायक हल्ल्याने संपूर्ण जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. प्राथमिक अहवालानुसार, या हल्ल्यात अमेरिकेचे दोन सैनिक जागीच ठार झाले असून, एक सैनिक अद्याप बेपत्ता आहे. या हल्ल्याची भीषणता इतकी प्रचंड होती की, जॉर्डनमधील अमेरिकेचा एक मुख्य लॉजिस्टिक्स प्लांट पूर्णपणे राखेच्या ढिगाऱ्यात बदलला आहे. मात्र, या लष्करी हल्ल्यापेक्षाही इराणने केलेल्या एका दाव्याने अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाला म्हणजेच पेंटागॉनला (Pentagon) मोठा धक्का दिला आहे.
इराणच्या आयआरजीसीने अधिकृत निवेदन जारी करून दावा केला आहे की, अमेरिकेचे मित्र राष्ट्र असलेल्या जॉर्डनच्या सैन्याने आणि पोलिसांनीच तेहरानला या अमेरिकी तळांची अत्यंत गुप्त माहिती पुरवली होती. जॉर्डनने अमेरिकेच्या सर्वात महत्त्वाच्या ‘अल-अझराक’ (Al-Azraq) हवाई तळासह इतर गुप्त लष्करी ठिकाणांची अचूक माहिती इराणला दिली, ज्याच्या जोरावर इराणने हे अचूक ड्रोन हल्ले घडवून आणले. जर हा दावा खरा ठरला, तर आखाती देशांमधील अमेरिकेचे सर्वात मोठे सुरक्षा कवच आणि अंतर्गत मित्रराष्ट्र फितूर झाल्याचे स्पष्ट होईल, ज्यामुळे वॉशिंग्टनच्या चिंतेत कमालीची वाढ झाली आहे. या भीषण हल्ल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यात अमेरिकन तळांवरून धुराचे प्रचंड लोट निघताना दिसत आहेत.
प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने (Wall Street Journal) दिलेल्या वृत्तानुसार, इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या तळांवर ज्या अचूकतेने (Precision Strikes) हल्ले केले आहेत, त्याने अमेरिकेचे लष्करी अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणा चक्रावून गेल्या आहेत. सुरुवातीला अमेरिकेला असा संशय होता की, चीनच्या गुप्तचर उपग्रहांद्वारे (Chinese Intelligence) इराणला ही अचूक माहिती मिळाली असावी. कारण अमेरिकेचे हे तळ वाळवंटी आणि गुप्त भागात अत्यंत कडक सुरक्षेत तैनात होते. परंतु, आता थेट इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सने जॉर्डनच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेचे नाव घेतल्यामुळे अमेरिकेच्या तपासाची संपूर्ण दिशाच बदलली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: ‘बॉम्ब पडण्याआधी शेवटचा फोन…’ अमेरिकेला इराणचा थेट सवाल; परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ
या गंभीर आरोपांवर अद्याप जॉर्डनच्या लष्कराने किंवा सरकारने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार, जॉर्डनच्या लष्करातील काही घटकांमध्ये अमेरिकेच्या या भागातील उपस्थितीबद्दल तीव्र असंतोष होता. इराणने नेमका याच गोष्टीचा फायदा उठवत अल-अझराक हवाई तळाची इत्थंभूत माहिती मिळवली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेने या फितुरीच्या दाव्यावर अद्याप कोणतेही थेट भाष्य केलेले नाही, मात्र अंतर्गत पातळीवर या तळांच्या सुरक्षेबाबत आणि माहिती लीक झाल्याप्रकरणी तीव्र तपास सुरू करण्यात आला आहे.
Iran’s Fars News: Satellite images reveal damage to the US base in Jordan. – New satellite images show the extent of the damage to the “Muwaqqar” base in Jordan following Iran’s retaliatory response to the source of attacks in the region. – The images show at least two… pic.twitter.com/4FMRiQKLTd — World Source News (@Worldsource24) July 20, 2026
credit – social media and Twitter
हा संघर्ष केवळ जॉर्डनपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर इराणने आखाती देशांमधील अमेरिकेच्या संपूर्ण लष्करी जाळ्यालाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या युद्धाच्या मालिकेत आतापर्यंत अमेरिकेचे अंदाजे २० सैनिक मारले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी इराकमध्ये झालेल्या हल्ल्यातही एका अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाला होता. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, केवळ जॉर्डनच नव्हे, तर कुवेत, कतार आणि बहरीनसारख्या अमेरिकेच्या पारंपरिक मित्रराष्ट्रांच्या भूमीवर असलेले अमेरिकन लष्करी तळही इराणच्या हल्ल्यात सुरक्षित राहिलेले नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Fazlur Rehman: ‘कारगिल युद्धाचे सर्वात मोठे पाप, पाकिस्तानी लष्कराने स्वतःच्या सैनिकांचे मृतदेह’ मौलाना डिझेल यांचा खळबळजनक दावा
‘वॉशिंग्टन पोस्ट’ने (Washington Post) उपग्रहांद्वारे मिळालेल्या ताज्या चित्रांचा (Satellite Imagery) हवाला देऊन एक खळबळजनक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, इराणच्या अलीकडील ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये आखात आणि संपूर्ण पश्चिम आशियातील अमेरिकेच्या लष्करी तळांवरील किमान २२८ इमारती, हँगर आणि अत्यंत महागडी लष्करी उपकरणे, रडार यंत्रणा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत किंवा त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अमेरिकेच्या आधुनिक इतिहासातील आखाती देशांमधील ही सर्वात मोठी लष्करी पीछेहाट मानली जात आहे. या घडामोडींमुळे येत्या काळात अमेरिका इराणवर थेट लष्करी कारवाई करणार का, आणि जॉर्डनसोबतच्या संबंधांचे काय होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.






