तुमच्या राशीनुसार 'असा' निवडा परफ्युम; काय सांगतं ज्योतिष शास्त्र, जाणून घ्या
रोजच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला परफ्युम हा महत्त्वाचा घटक झाला आहे. त्यामुळे बाहेर जाताना , कामाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जाताना परफ्युम मारल्याशिवाय कोणीही घराबाहेर जात नाही. बाजारात अनेक प्रकाराची सुगंधी द्रव्ये मिळतात पण कोणता परफ्युम आपल्यासाठी योग्य आहे हे बऱ्याचदा कळत नाही. जर तुम्हालाही हाच प्रश्न पडत असेल तर ज्योतिष शास्त्रात याचं उत्तर दिलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात…
सुगंधी परफ्युम पाहिले की बऱ्याचदा आपल्याला कोणता साजेसा असेल किंवा नेमका कोणता परफ्युम विकत घ्यावा यात गोंधळ उडतो. मात्र ज्योतिष शास्त्राततुम्हाला कोणता परफ्युम साजेसा असेल, याबद्दल सांगितलं आहे.
मेष राशीच्या व्यक्तीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. ही मंडळी मंगळाच्या अधिपत्याखाली असल्याने धाडसी उत्साही आणि तापट स्वभावाची असतात. म्हणूनच यांच्या अंगात उष्णता भरपूर असते.या व्यक्तींना खूप घाम येतो. म्हणून महत्वाच्या कामाला जाताना मेष राशीच्य़ा मंडळींनी मोगऱ्याचा परफ्युम वापरावा. मोगऱ्याच्या सुगंधाने यांना राग नियंत्रणात ठेवणं जमतं. असं ज्योतिष शास्त्रात सांगितलं जातं.
वृषभ राशीची माणसं ही स्वभावाने आणि दिसायलाही मोहक असतात. वृषभ रास शुक्राच्या अंबलाखाली येत असल्य़ाने ही माणसं अत्यंत रोमॅंटीक असतात. यांनी कुठल्याही महत्वाच्या कामाला जाताना चमेलीचा परफ्युम वापरल्यास खूप चांगले परिणाम होतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीची माणसं अतिशय बुद्धीवान असतात. बुध राशी स्वामी असल्याने यांचं संवाद कौशल्य इतरांना आकर्षित करतं. ज्योतिष शास्त्रानुसार या व्यक्तींनी चमेलीचा परफ्युम वापरल्याने कामाच्या ठिकाणी वरिष्ठ यांच्या कामावर समाधानी असतात. यांना मान सन्मान मिळण्यास देखील मदत होते. असं ज्योतिष शास्त्र सांगतं.
कर्क राशीची मंडळी अत्यंत हळव्या मनाची असतात. चंद्रदेव यांचा राशीस्वामी असल्याने कर्क राशीला स्त्रीत्वाची रास म्हणून ओळखतात. ही माणसं चंद्राप्रमाणेच माणसं शांत असली तरी चंचल स्वभावाची असतात. या माणसांना बऱ्याचदा ठोस निर्णय घेणं जमत नाही. त्यामुळे व्यवहारात किंवा कामाच्या ठिकाणी यांना बऱ्य़ाच समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच या राशीच्या माणसांनी ‘लव्हेंडर फ्लेवर’ असलेला परफ्युम वापरावा असं ज्योतिषशास्त्र सांगतं.
सूर्य देव राशीस्वामी असल्याने या मंडळींमध्ये आत्मविश्वासाने जगण्याची धमक असते. या व्यक्ती सूर्यासारख्याच तेजस्वी असतात. यांना समाजात, व्यवसायात मान सन्मान मिळतो. ज्योतिष शास्त्रानुसार या मंडळींनी ‘चॉकलेट’ किंवा ‘व्हॅनिला’ फ्लेवरचे परफ्युम वापरावेत. त्यामुळे यांच्य़ा व्यक्तीमत्वात चांगले बदल दिसून येतात.
मिथुनप्रमाणेच कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. ही माणसं अगदी नाकासमोर चालणारी सगळ साध्या स्वभावाची असतात. ही मंडळी भावनाशील असल्याने घर,संसार आणि कुटुंब यांना जास्त प्रिय असते. यांच्या व्यक्तीमत्वाला ‘गुलाब’ किंवा ‘चमेली’चा परफ्युम फायदेशीर ठरतो.
वृषभेप्रमाणेच तुळेचा स्वामी हा शुक्र ग्रह असल्याने ही मंडळी दिसायला देखणी आणि कलारसिक असतात. ही माणसं त्यांच्या मोहक आणि शांत स्वभावाने इतरांचं लक्ष वेधून घेतात. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या व्यक्तींना ‘चॉकलेट’ किंवा ‘चमेली’चा परफ्य़ुम साजेसा ठरतो.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा काहीसा गुढ असतो. हे सहसा मनातलं कधीच कोणाला सांगत नाही. या राशीच्या माणसांना ‘चंदन’ आणि ‘गुलाबा’चा परफ्युम वापरणं फायदेशीर ठरतं.असं ज्योतिष शास्त्रात सांगितलं आहे.
या व्यक्तींचा स्वभाव निश्चयी आणि संयमी असतो. यांचा गुरु ग्रह यांचा राशी स्वामी असल्याने संयमी आणि आदरयुक्त वागणं हे यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्यं आहे. या मंडळींच्या व्यक्तीमत्वाला ‘चंदन’ ,’चमेली’ आणि ‘मोगऱ्या’चा परफ्युम साजेसा आहे.
मकर राशीची माणसं संघर्ष करणारी असतात. कष्टाची यांना लाज वाटत नाही. या मंडळींनी ‘कस्तुरी फ्लेवर’ असलेला परफ्युम वापरल्यास यांच्या जीवनात सकारात्मकता वाढीस लागते, असं ज्योतिष शास्त्रात सांगितलं आहे.
सुकलेल्या तुळशीच्या देठाने ‘अशी’ करा भगवान विष्णूंची पुजा, वास्तूदोष होईल दूर
मकर प्रमाणेच या राशीचा स्वामी देखील शनी ग्रह आहे. ही मंडळी तापट स्वभावाची असतात. तत्वनिष्ठ आणि अभ्यासू वृत्तीचे असतात. म्हणूनच ‘स्मोकी’ आणि ‘इन्टेन्स वूडी’ किंवा ‘अंबर नोट्स परफ्युम’ यांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम टाकतात.
गुरु स्वामी असलेली ही रास जलतत्त्वाची आहे. या राशीची माणसं संवेदनशील मनाची असतात. म्हणूनच यांना कस्तुरी’चा परफ्युम लाभदायी ठरतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)