गरुण पुराणात लपलंय नशीबवान मुलांचं रहस्य (फोटो सौजन्य - iStock)
गरुड पुराणानुसार, मुलाचे शुद्धीकरण पालकांच्या शुद्धीकरणापासून सुरू होते. शास्त्रांनुसार, पती-पत्नीने मासिक पाळीच्या वेळी लैंगिक संबंध टाळावेत. धार्मिक श्रद्धेनुसार, हा काळ अशुद्ध मानला जातो आणि आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो.
गर्भधारणा कधी करावी?
गरुण पुराणानुसार, मासिक पाळीच्या पाचव्या दिवशी स्नान केल्यानंतर स्त्रीने पूर्णपणे शुद्ध व्हावे. गरुड पुराणानुसार, स्त्री ला सात दिवसांनीच देव आणि पूर्वजांची पूजा करण्याची पात्रता असते. चांगल्या चारित्र्याचे मूल जन्माला घालण्यासाठी या वेळेनंतर गर्भधारणेचा प्रयत्न करणे सर्वोत्तम मानले जाते. एखाद्या स्त्री अथवा पुरुषाला आपल्या पोटी नशीबवान आणि उत्कृष्ट काम करणारे मूल जन्माला यावे वाटत असेल तर त्यांनी गरुड पुराणातील या नियमाचे पालन करून पहावे.
Garud Puran: लहान वयातच मूल मरण पावले तर त्याचा आत्मा स्वर्गात जातो की नरकात?
सम आणि विषम दिवसांचा गुप्त नियम
गरूड पुराणात तारखा आणि दिवसांच्या निवडीबाबत खूप तपशीलवार गणना केली आहे. त्यानुसार, जर एखाद्या जोडप्याला मुलगा हवा असेल तर त्यांनी मासिक पाळी संपल्यानंतर सम दिवशी (८, १०, १२, १४ किंवा १६) गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करावा. जर एखाद्या जोडप्याला मुलगी हवी असेल तर त्यांनी मासिक पाळीनंतर विषम दिवस (९, ११, १३, १५ किंवा १७) निवडावेत.
पालकांची मानसिक स्थिती
सर्वात महत्त्वाचा नियम मुलाच्या जन्माच्या वेळी पालकांची मनस्थिती कशी आहे ते महत्त्वाचे आहे. मुलाचा जन्म हा पालकांच्या मनःस्थितीशी संबंधित आहे. गरूड पुराणानुसार, गर्भधारणेच्या वेळी पुरुष आणि स्त्रीची मनःस्थिती मुलाचे स्वरूप ठरवते असे मानले जाते. या प्रक्रियेदरम्यान, दोन्ही जोडीदारांचे मन शांत, शुद्ध आणि देवाला समर्पित असले पाहिजे. राग, मत्सर किंवा भीतीचा मुलाच्या मानसिक विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जेव्हा शारीरिक संबंध ठेवले जातात तेव्हा ते दोघांच्या सहमतीने, प्रेमाने आणि मन शांत असेल तेव्हाच स्वाभाविक आणि नैसर्गिकरित्या ठेवले गेल्यास पोटी उत्तम मूल जन्माला येते आणि त्याची जगभरात कीर्ती होते.
घरातल्या लोकांच्या मृत्यूनंतर का वाचावं गरुड पुराण? काय आहे यामागची श्रद्धा? घ्या जाणून…
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.






